शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: नाशिक , गुरूवार, 22 सप्टेंबर 2016 (18:04 IST)

अभाविपचे १५ वे ' प्रतिभा संगम राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन'

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे १५ वे  राज्यस्तरीय विद्यार्थी साहित्य संमेलन "प्रतिभा संगम" नाशिक मध्ये दि.२३ ,२४ ,२५ सप्टेंबरला रावसाहेब थोरात सभागृहात वसवलेल्या महाकवी वामनदादा कर्डक नगरात संपन्न होत आहे . या संमेलनाचे उदघाटक म्हणून सुप्रसिद्ध कादंबरीकार  श्री.विश्वास पाटील उपस्थित राहतील.
 
शुक्रवार दि.२३ सप्टेंबर रोजी सायं.५.३० वा कादंबरीकार श्री.विश्वास पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन होईल तत्पूर्वी  सायं.४ वा. सा.वा.ना चे अध्यक्ष श्री.मिलिंद जाहगिरदार यांच्या शुभ हस्ते ग्रंथ दिंडीस कुसुमाग्रज निवास्थान येथून शुभारंभ होईल .रात्री ८.३० वा. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवार दि.२४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.०० वा. जेष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांची प्रकट मुलाखत , दुपारी ३.०० वा. कथाकथन व अभिवाचन ,सायं.५.०० वा मुक्तसंवाद तसेच रात्री ८.३० वा निवडक विद्यार्थी साहित्यिकांचे कवी संमेलन होणार आहे. रविवार दि.२५ सप्टेंबर रोजी सकाळी .९.०० वा. भाषा और साहित्य या विषयावर प्रा.डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन यांचे व्याख्यान होईल, स.१०.३० वा. लेखन , स्वातंत्र्य , मर्यादा भान या विषयावर विद्यार्थ्यांचे परिचर्चा होईल , दु.२.३० वा. साहित्यिकांचा अविष्कार या विषयावर गायक नंदेश उमप यांचे व्याख्यान आहे , सायं.४.०० वा समारोप व पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या हस्ते  तसेच नामांकित वक्ते प्रा.प्रकाश पाठक यांचे व्याख्यान होईल.
    
अभाविप चे १५ वे साहित्य संमेलन पहिल्यांदाच कुसुमाग्रजांच्या साहित्य नगरी नाशिक येथे होत असून राज्यस्तरावर  विद्यार्थ्यांच्या साहित्य प्रतिभेला वाव देणारे हे राज्यातील एकमेव व्यासपीठ आहे . विद्यार्थ्यांना योग्य वयात साहित्य जाणिवा समृद्ध करून सकस साहित्य निर्मितीच्या प्रवाहशी जोडणे तसेच केवळ उत्सवी संमेलन न भरविता साहित्य कार्यशाळा या रुपाने संमेलनाचे आयोजन आहे . या संमेलनासाठी राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्यिकांना खुले निमंत्रण देण्यात आले आहे . या संमेलनात कविता कथा , वैचारिक लेख ,कथा नाट्य ललित लेख , लघुपट (short film ) , ब्लॉग , पथनाट्य या साहित्य प्रकारांचा समावेश असेल या साहित्य संमेलनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत महाराष्ट्राच्या विविध भागातून विद्यार्थी या मध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत .कविता व पथनाट्य या प्रकारात अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत .या निमित्ताने महाराष्ट्रातील महाविद्यायात साहित्य चळवळ अधिक सकस करण्यासाठी मराठी व साहित्य विषयातील प्राध्याकाची एक बैठक याच काळात प्रतिभा संगम परिसरात होणार आहे . या साहित्य संमेलनाच्या नगराला "महाकवी वामनदादा कर्डक" असे नाव देण्यात आले आहे , प्रदर्शनी कक्षाला नाशिकचे सुपुत्र स्व.मुरलीधर खैरनार यांचे नाव देण्यात आले आहे व व्यासपीठाला निसर्ग कवी स्व.नलेश पाटील नाव देण्यात आले आहे .
 
प्रतिभा संगम साहित्य संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध १५ गट तयार करण्यात आले आहे यात ८० विद्यार्थी कार्यकर्ते काम करीत आहेत. तीन दिवस साहित्य कुंभामध्ये समाजातील अधिकाधिक साहित्य प्रेमींनी सहभागी व्हावे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन स्वागताध्यक्षा निलीमाताई पवार ,कार्याध्यक्ष महेश दाबक व सचिव दिनेश रणदिवे यांनी केले आहे.