शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

चिं.वि. जोशी

WD
चिं.वि. जोशी हे मराठीतील एक महत्त्वाचे विनोदी लेक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे संपूर्ण नाव चिंतामण विनायक जोशी. त्यांचा जन्म 19 जानेवारी 1892 रोजी पुणे येथे झाला होता. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालय आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्यांच्या पाली भाषेचा विशेष व्यासंग होता. बौद्ध धर्मासंबंधी त्यांनी काही लेखन केले आहे.

चिं. वि. जोशी विनोदी लेखनाबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या विनोदातून मानवी जीवनातील व स्वभावातील विसंगतीचे दर्शन होते. चिमणभाऊ व गुंड्याभाऊ ही त्यांनी निर्मार केलेल्या व्यक्तीरेखांची जोडगोळी मराठी साहित्यात कायमचे स्थान मिळवून बसली आहे. विशुद्ध किंवा निर्मळ विनोद हे चिं. वि. जोशी यांच्या विनोदाचे प्रमुख वैशिष्टय मानले जाते.

एरंडाचे गुर्‍हाळ, वायफळाचा मळा, ओसाडवाडीचे देव, गुंड्याभाऊ, रहाटगाडगे, लंकावैभव, हास्यचिंतामणी, बोरीबाभळी, चिमरणावांचे चर्‍हाट इ. त्यांची पुस्तके गाजलेली आहेत. 21 नोव्हेंबर 1963 रोजी त्यांचे निधन झाले.