बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: कोलकाता , शुक्रवार, 29 जुलै 2016 (10:57 IST)

ज्येष्ठ लेखिका महाश्वेतादेवी यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेतादेवी (वय 90) यांचे गुरुवारी दीर्घआजाराने निधन झाले. साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. पद्मविभूषण, मॅगसेसे पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 
दोन महिन्यांपासून त्यांच्यावर कोलकातातील बेलेव्यू रुग्णालयात उपचार सुरु होते. 23 जुलैला त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यातच त्यांचे निधन झाले. देशाने एक महान लेखिका गमावली आहे. पश्चिम बंगालने एक महान आई गमावली आहे. मी एक जवळचा मार्गदर्शक गमावला आहे, अशा भावना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टिटद्वारे व्यक्त केल्या.
 
‘झाँसी की रानी’, ‘जार चौराशिर माँ’, ‘रुदाली’, या त्यांच्या महत्त्वपूर्ण कादंबर्‍या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांवर आधारित चित्रपट तयार करण्यात आले आहेत.