शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By wd|
Last Modified: पुणे , सोमवार, 25 ऑगस्ट 2014 (10:11 IST)

मराठी साहित्य संमेलनाध्यक्षासाठी चार जण उत्सुक

पंजाबमधील घुमान येथे होणार्‍या 88 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चार जण  उत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत, डॉ. श्रीपाल सबनीस तसेच भारत सासणे व मधुसूदन घाणेकर यांचा समावेश आहे.
 
 अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत 13 ते 23 सप्टेंबर असणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख असेल. 9 ऑक्टोबरपासून मतदारांना मतपत्रिका पाठवल्या जातील.  अध्यक्षपदासाठीची मतमोजणी व निकाल 10  डिसेंबरला जाहीर केला जाणार असल्याची माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.