बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

व्यक्तिविशेष : हिरवंशराय बच्चन

WD
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे पिता म्हणून हरीवंशराय बच्चन यांची ओळख आपल्याला आहे. पण ते अतिशय महान हिंदी कवी होते. मधुशाला हा त्यांचा गाजलेला काव्यसंग्रह. हरीवंशराय बच्चन यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 रोजी उत्तर प्रदेशातील पट्टी या ठिकाणी कायस्थ कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव हरीवंशराय श्रीवास्तव.

कें‍ब्रिज विद्यापीठातून इंग्रजी साहित्यावर पीएच.डी. मिळवणारे ते दुसरे भारतीय. हरीवंशराय बच्चन हे विसाव्या शतकाच्या सुरूवातीला हिंदी साहित्यात सुरू झालेल्या छायावाद या साहित्यिक चळवळीतील एक आघाडीचे कवी होते. 1935 मध्ये त्यांनी त्यांचा प्रसिद्ध काव्यग्रंथ मधुशाला लिहिला. या काव्याने त्यांना कवी म्हणून प्रस्थापित केले. हरीवंशराय बच्चन यांचे तीस काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. मधुशालाचे भाषांतर इंग्रजी, मराठी, बंगाली आणि मल्याळीत झाले आहे. हरीवंशराय यांनी शेक्सपियरच्या रुबैय्या आणि भगवद् गीतेचे हिंदी भाषांतर केले आहे. डब्लू. बी. यीट्सच्या ‍कव‍ितांचेही त्यांनी हिंदीत भाषांतर केले. 'निशा निमंणि', 'खादी के फूल', 'एकांत संगीत', 'सतरंगिनी' हे त्यांचे काही गाजलेले कवितासंग्रह.