शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

कर्णेश्वर महादेव

- अनिरुद्ध जोशी

मध्य प्रदेशातील माळवा परिसरात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यातील एक म्हणजे सेंधल नदीच्या तीरावर असलेले कर्णेश्वर महादेवाचे मंदिर. कर्णावत नगरीचे राजा कर्ण येथे येऊन ग्रामस्थांना दान देण्याचे महान कार्य करत होते. त्यावरून या मंदिराचे नाव कर्णेश्वर मंदिर असे पडले आहे. धर्मयात्रेच्या या भागात आम्ही याच मंदिरात घेऊन जात आहोत. देवासपासून अवघ्या 45 किलोमीटरवर कणेश्वर महादेवाचे मंदिर आहे.

कर्ण राजाने आदीशक्तीची कठोर तपश्चर्या केले होती. कर्ण राजा देवीला दररोज स्वत:ची आहूती देत होते. आदीशक्ती राजाची निस्सीम भक्ती पाहून प्रसन्न होत होती. ती अमृताचे थेंब देऊन राजाला रोज जिवंत करून सव्वा मण सोने देत होती. राजा कर्ण मंदिरात बसून ग्रामस्थांना दानधर्म करत होता, अशी आख्यायिका आहे.

WD
मालवा व निमाड परिसरात कौरवांकडून स्थापन करण्यात आलेल्या अनेक मंदिरामध्ये पाच मंदिरे प्रमुख मानली जातात. त्यात ओंकारेश्वर येथील ममलेश्वर, उज्जैन येथील महाकालेश्वर, नेमावरमधील सिद्धेश्वर, बिजवाडमधील बिजेश्वर व कर्णावत येथील कर्णेश्वर ही ती मंदिरे आहेत.

कर्णेश्वर महादेव मंदिरातील पुजारी हेमंत दुबे यांनी सांगितले, की, अज्ञातवासात असताना कुंती वाळूचे शिवलिंग बनवून भोळ्या शंकराची पूजा करत होती. तेव्हा पांडवानी तिला विचारले की, मंदिरात जाऊन शंकराची आराधना का नाही करत? त्यावर कुंती म्हणाली, की या परिसरात जी काही मंदिरे आहेत. ती कौरवांनी स्थापन केलेली आहेत. तेथे जाण्यास आपल्याला परवानगी नाही.

WD
कुंतीचे म्हणणे ऐकून पांडव अस्वस्थ झाले व त्यांनी योजनाबद्धरित्या एका रात्रीत पाचही मंदिरांचे मुख बदलून पश्चिममुखी करून टाकले. त्यानंतर त्यांनी कुंतीला सांगितले की, आता या परिसरातील कुठल्याही शिव मंदिरात ती शंकराची आराधना करू शकते. कारण ती मंदिरे आपण बनविली आहेत.

कर्णेश्वर मंदिरात असलेली गुहा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरापर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. गावातील काही नागरिकांकडून ही गुहा सुरक्षिततेच्या कारणावरून बंद करण्यात आली आहे.

येथे सालाबादाप्रमाणे श्रावणात मोठा उत्सव आयोजित केला जातो. उत्सवादरम्यान बाबा कर्णेश्वर महादेवाची भव्य मिरवणूक काढण्यात येते.

कसे पोहचाल -
हवाई मार्ग :- कर्णावत येथे जाण्यासाठी सगळ्याच जवळचे विमानतळ इंदूर येथे आहे.

रेल्वे मार्ग :- इंदूर येथून 30 किलोमीटरवर असलेल्या देवास येथून कर्णावतला जाण्यासाठी बस अथवा खाजगी वाहने सहज उपलब्ध होतात.

महामार्ग :- देवास येथून 45 किलोमीटरवर असलेल्या चाप्रा जाण्याकरता बस व टॅक्सी सहज उपलब्ध होते. तेथून काही अंतरावरच कर्णेश्वराचे मंदिर आहे.