बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By अय्यनाथन्|

श्री अरूणाचलेश्वर (तिरूअन्नामलय्यर) मंदिर

WDWD
अरूणाचलेश्वर मंदिर असलेल्या पवित्र टेकडीस प्रत्येक पौर्णिमेस जवळपास दोन ते तीन लाख भाविक अनवाणी पायांनी चौदा किलोमीटर प्रदक्षिणा घालतात. मंदिराच्या वार्षिक सोहळ्याच्या निमित्ताने या पवित्र टेकडीवर प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योतीचा 'याची देही याची डोळा' अनुभव घेण्यासाठी जवळपास पंधरा लाख भाविक जमतात.

हिंदू धर्मांत महाशिवरात्र या पवित्र सणांची सुरवात या ठिकाणाहूनच झाली. दक्षिणेतील सुप्रसिद्ध श्री अरूणाचलेश्वर मंदिर तमिळ भाविकांमध्ये तिरू अन्नामलाईयार नावानेही प्रचलित आहे. साक्षात भगवान शंकराची ही टेकडी असल्याचे मानण्यात येते. टेकडीची उंची साधारणत: अडीच हजार फूट आहे.

वेबदुनियाच्या धर्मयात्रेत या आठवड्यात आम्ही
WDWD
तुम्हाला पवित्र अरूणाचलेश्वराची टेकडी, तेथील प्राचीन मंदिर व थिरूअन्नामलाई या धार्मिक महात्म्य लाभेलेल्या शहराची यात्रा घडवणार आहोत. धार्मिक, अध्यात्मिक महात्म्य लाभलेल्या या ठिकाणी एकदा तरी डोके टेकवून पुण्य पदरी पाडलेच पाहिजे. भगवान शिवशंकराच्या पंचमहाभूतांपैकी श्री अरूणाचलेश्वर एक आहे. (अरूणाचलेश्वर हे अग्नीक्षेत्र आहे. कांची व तिरूवरूर हे पृथ्वी, चिदंबरम आकाश, श्री कलाहस्ती वायू व तिरूवनायका जलक्षेत्र आहेत.)

महाशिवरात्र
शिवपुराणानुसार भगवान शंकराने विराट अग्निरूप धारण करून ब्रह्मा व विष्णूस आपल्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येथेच दिली होती. देवराज ब्रह्मा व विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वासाठी वाद झाला. श्रेष्ठ कोण यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ते भगवान शंकराकडे आले. शंकराने दोघांपैकी जो माझ्या डोक्याचे किवा पायांचे दर्शन घेऊ शकेल तो श्रेष्ठ, अशी अट घातली.

भगवान शंकराने धरतीपासून आकाशापर्यंत पेटत्या ज्योतीचे रूप धारण करून दोघांनाही डोके व पाय शोधण्यास सांगितले. भगवान विष्णूंनी वराहाचे रूप धारण केले व भगवान शिवाचे पाय शोधण्यासाठी जमीन खोदण्यास सुरूवात केली. ब्रह्मदेवाने हंसाचे रूप धारण करून महेश्वराचे डोके शोधण्यासाठी आकाशात भरारी घेतली. मह्त्प्रयायासानंतरही त्यांना महेश्वराचे डोके किवा पाय शोधण्यात यश आले नाही.

WDWD
विष्णूंनी पराभव स्वीकारला. ब्रह्मदेवही दमले. त्यांनी आकाशातून फूल पडत असल्याचे पाहिले. ब्रह्मदेवाने त्याला विचारणा केली असता, भगवान शंकराच्या केसांच्या जटांमधून पृथ्वीवर पोहचण्यासाठी युगायुगाचा प्रवास करत असल्याचे उत्तर त्याने दिले. शिवाच्या अग्निरूपातून निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेत धरती तर होरपळून निघालीच, शिवाय स्वर्गही असहाय्य उष्णतेने उकळून निघाला.
WDWD
इंद्र, यम, अग्नी, कुबेर, आणि आठही दिशांच्या देवता शंकराच्या विशालकाय देहातून पडून महेश्वरास शांत करण्यासाठी प्रार्थना करू लागल्या. शक्ती व सर्व देवतांची मुखे शिवाची प्रार्थना करू लागले. शिवाने त्यांची आराधना मान्य केली आणि तो आपल्या पूर्वरूपात प्रकटला. यावेळी सर्व देवादिकांनी महेश्वरास मानवंदना दिली. हा पवित्र क्षण महाशिवरात्र म्हणून साजरा करण्यात येतो.

लिंगोत्भव!
भगवान शंकर अग्निरूपातून शीतल रूपात आल्यापासून त्यांना येथे अरूणाचलेश्वर किवा तिरूअन्नामलायार म्हणून ओळखले जाते. ‍अग्निरूपातील शंकर व त्यांच्या पायाशी ‍विष्णू वराहाच्या तर हंसाच्या रूपातील ब्रह्मदेवही येथे आहेत, आकाशातून पुष्पवृष्टी होत आहे, या शिल्पास लिंगोत्भव म्हणतात. हे शिल्प अप्रतिम आहे. मंदिराच्या गर्भागृहापासून शंकराच्या सर्वंच मंदिरात हे शिल्प पहायला मिळते.

धार्मिक महात्म्यामुळेच अनादीकाळापासून लाखो
WDWD
भाविक ह्या टेकडीची पूजा करतात व प्रत्येक महिन्यात पौर्णिमेस भक्तीभावाने प्रदक्षिणा घालतात. येथे पावलोपावली आपणांस नंदीचेही दर्शन घडते. भगवान शंकराची ही प्राचीन टेकडी भूगर्भीयदृष्ट्याही इतर टेकड्यांच्या तुलनेत प्राचीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. भक्तगणाच्या सोयीसाठी शंकराने लिंगाच्या स्वरूपात दर्शन घेण्यास मान्यता दिली.

तिरूअन्नामलायार मंदिरात आपल्याला त्यांचे दर्शन घेता येते. चोल राजवटीत मंदिर शहरात होते आणि आदी अन्नामलायार ‍मंदिर मुख्‍य मंदिराच्या अगदी विरूद्ध दिशेला होते. टेकडी सर करताना आठही लिंगाचे दर्शन घडते. मंदिराभोवती अनवाणी प्रदक्षिणा घातल्यास सर्व पाप व मानवी बंधनातून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. अबालवृद्ध येथे मुक्तीसाठी प्रदक्षिणा घालतात. म्हणूनच ''आपण या पवित्र तीर्थाची आठवण केल्यास आपण येथे पोहचाल'', असे श्री रमण महर्षी व संत शेषाद्री स्वामी सांगतात, ते काही उगीच नाही.

WDWD
जाण्याचा मार्ग : रस्ते मार्गाने जायचे झाल्यास चेन्नईपासून येथील अंतर आहे 187 किलोमीटर. तिरूवन्नमलाई येथे आपण राज्य परिवहन खात्याच्या गाडीनेही जाता येते. नियमित बस व टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.

रेल्वेमार्गाने जायचे झाल्यास चेन्नईहून कोणत्याही रेल्वेने थिंडीवनम किवा विल्लुपुरमला पोहचा व तिरूअन्नमलाईसाठी दुसरी ट्रेन पकडा. विमानाने जायचे झाल्यास चेन्नई येथून तिरूवअन्नमलाईपर्यंत विमानसेवा उपलब्ध आहे. प्रवास आहे जवळपास 175 किलोमीटरचा.