शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी साहित्य संमेलन-०८
Written By वेबदुनिया|

प्राकृत हे साखर

प्राकृत आणि संस्कृत दोनीमाजी एकचि अर्थ
जैसा दोन स्त्रियांचा एक नाथ दोनी हस्त एकाचेची
दोन दाढा एकचि स्वर पाहाणार एक दोन नेत्र
किंवा दोन पात्रांत पवित्र एकचि दुग्ध घातले.
अबळांस न कळे संस्कृत वाणी जैसे आडांतील पाणी
परी दोरपात्रांवांचुनी अशक्त जनी केंवि निघे.
तें तडागासि येतां त्वरे तात्काळाचि तृषा हरे
भोळे जन तारावया ईश्वरे प्राकृत ग्रंथ निर्मिले.
मुख्य संस्कृत पहावें तरी तें अबळां नेणवे
महागज कैसा बांधवे कमलतंतु घेउनी.
उत्तम वस्त्रें लेती नृपती तीं दुर्बलासी प्राप्त न होती
मग घोंगडी पांघरती शीत उष्ण निवारणा.
गीर्वाण हे शशिमंडळ अद्भुत त्याची प्रभा ही प्राकृत
संस्कृत ग्रंथ वर्णिती पंडित अर्थ प्राकृत करिती की.
कष्टेवीण राज्य आले हाता तरी कां हो सोडावे तत्वता
प्राकृत भाषा लेवोनि कथा लाभ श्रोता सेविजे ते कीं.
संस्कृत इक्षुरस अपार त्याची प्राकृत हे साखर
सुज्ञ जन सुकुमार सेवणार प्रेमरसी मिळवूनियां.
- श्रीधर