testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लग्न जुळवताय? सावधान !

वेबदुनिया|
तुळशीच्या लग्नानंतर विवाहेच्छू तरूण-तरूणींसाठी स्थळसंशोधन सुरू होतं. प्रत्येक समाजात वर- वधू मेळावे भरविले जातात. मुला-मुलीच्या वि‍वाहासाठी पालकवर्ग आयुष्यभर जमा केलेली पुंजी खर्ची घालतात. केवळ विश्वासाच्या जोरावर दोन अनोळखी जीवांना एकत्र आणतात. परंतु, काळाच्या प्रवाहात 'विश्वास' मागे पडला आहे. समाजात चोर- भामट्यांचा सुळसुळाट झाला आहे. निरखून, पारखून 'संशोधन' नाही केले तर अंती पदरी पडते. शेवटी नशिबाला दोष देण्यात संपूर्ण आयुष्य निघून जाते. त्यामुळे विवाहाची बोलणी करण्यापूर्वीच काळजीपूर्वक पाऊल उचलणे गरजचे आहे.

विशेषतः मुलीच्या बाबतीत फसवणुकीची शक्यता जास्त असते. त्यातही मुलीची अब्रू समाजात अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तिची फसवणूक झाल्यास आयुष्यभर स्वतःला कोसत बसण्याशिवाय तिच्यापुढे पर्याय उरत नाही. म्हणूनच मुलीच्या पालकांनी कुणाही अनोळखी मुलाच्या गळ्यात आपल्या मुलीला हार घालण्यापूर्वी नीट चौकशी केली पाहिजे. भावनेच्या भरात घाईगडबडीने घेतलेला निर्णय चुकू शकतो.
मुलीसाठी चांगल्या वराची निवड करताना पालकवर्गात जागरूकततेचा अभाव आहे. वरचेवर आपण मुलाला पाहतो, त्याला मुलगी दाखवतो आणि उडवून टाकतो लग्नाचा बार! मात्र आता काळ झपाट्याने बदलत जात आहे. वधु पित्याच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. म्हणूनच वर आणि वधुची माहिती काढण्यासाठी हल्ली डिटेक्टिव नेमले जात आहेत. गेल्या दोन वर्षात डिटेक्टिव लोकांना तर सुगीचे दिवस आले आहेत.

वराची माहिती काढताना विद्यार्थीदशेपासून तर पार पोलीस रेकॉर्ड पाहिले जाऊ लागले आहे. मुलासह त्याच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती, वर्तणूक, त्यांचे समाजातील स्थान, मुलाचे शिक्षण व नोकरीविषयी सखोल माहिती मिळविली जात आहे. अगदी डिटेक्विव नाही नेमला तरी तुम्हीही जुळवताना खालील काळजी घ्या.

1) विवाह जुळवताना वर संदर्भात थोडासाही संशय आल्यास त्याविषयी संपूर्ण माहिती काढा.
2) नातेवाईकांनी सांगितलेल्या गोष्टींवर ठेवण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा.
3) विवाहावर लाखो रूपये खर्च करण्यापूर्वी थोडे पैसे खर्च करून मुलाची संपूर्ण माहिती करून घेणे महत्त्वाचे आहे.
4) बायोडाटा व नोकरी ठिकाणचे कागदपत्र जाणीवपूर्वक तपासून पहा.
5) मुलासह त्याच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती, वर्तणूक, त्यांचे समाजातील स्थान, मुलाचे शिक्षण व नोकरीविषयी सखोल माहिती मिळवावी.
6) मेडिकल सर्टीफिकेट व रक्त गट देखील जाणून घ्या. एचआयव्ही टेस्टही करून घ्या.
7) विवाहापूर्वी त्या मुलाची दोन- तीनदा भेट घ्या.
8) वेबसाइटच्या माध्यमातून विवाह जुळवताना अधिक लक्ष दिले पाहिजे.
9) दबावात विवाह जुळवणी करू नये.
10) डिटेक्टिव नेमायचा असेल तर तो प्रोफेशनल असला पाहिजे. कारण या कानाची खबर त्या कानापर्यंत पोहचत नाही.


यावर अधिक वाचा :

Vodafone 351 रुपयांच्या रिचार्जमध्ये देत आहे अनलिमिटेड ...

national news
या दरम्यान यूजर्सला लाइव्ह टीव्ही, मूव्ही आणि व्हिडिओसाठी वोडाफोन प्लेची सुविधा मिळते. ...

नाकारले गिफ्ट आणि नोट नवर्‍यामुलाला हवं मोदींसाठी वोट

national news
आहेर, लिफाफे आणि बुके आणू नये अशी विनंती करत असलेले लग्नाचे कार्ड तर आपण बघितले असतील ...

ऑनर किलिंग: घरच्यांनी प्रेमी जोडप्याचे तुकडे केले

national news
बिहार येथील गयामध्ये एका प्रेमी जोडप्याला प्रेमाची किंमत आपले प्राण गमावून द्यावी लागली. ...

दिल्लीच्या हॉटेलमध्ये आग लागल्याने 17 जणांचा मृत्यू, जीव ...

national news
नवी दिल्ली - करोल बाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे आग लागल्यामुळे 17 ...

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

national news
केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ ...

सकाळी रिकाम्या पोटी स्प्राउटेड चणे खा आणि रोग टाळा

national news
सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी स्प्राउटेड चणे खाणे खूप फायदेशीर आहे, यामुळे शरीर स्वस्थ राहतो ...

म्हातारपणात सर्वात जास्त होतात हे 3 आजार, 50 वर्षांचे झाले ...

national news
म्हातारपणात मनुष्याला काही आजारपण जास्त त्रास देतात. हे आजार म्हातारपणाचे दुखणे अधिक ...

आपणही डिस्पोझेबलमध्ये चहा पिता का?

national news
जर आपणही डिस्पोझेबलमध्ये चहा, सूप किंवा कॉफी पित असाल तर सावध व्हा. या डिस्पोझेबल ...

त्या दरम्यान पार्टनरचे डोळे होत असतील बंद तर जाणून घ्या

national news
लोकं याबद्दल प्रश्न विचारायला लाजतात परंतू पुरुषांच्या मनात येणारा एक प्रश्‍न हा देखील ...

"जमेल तसे प्रत्येकाने ... कुणावर तरी प्रेम करावे ...

national news
"जमेल तसे प्रत्येकाने ... कुणावर तरी प्रेम करावे ... कधी संमतीने .. कधी एकतर्फी ..