Widgets Magazine
Widgets Magazine

पावसाळ्यात घ्या काळजी लेदर शूजची

पाऊस आला की तुमचे महागडे लेदर शूज खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिसवात लेदर शूजची काळजी घेणं गरजेचं असतं. असे जपायचे लेदर शूज? जाणून घेऊया... 
 
* पावसाळ्यात सगळीकडे चिखल होतो आणि बुटांना चिकटून बसतो. चिखल सुकल्यावर काढणं कठिण होतं. चिखलाचे डागही बुटांवर पडतात. अशा वेळी बुटांवर ब्रश मारणं योग्य ठरतं. 
 
* बुटांसाठी चांगल्या दर्जाचं पॉलिश आणा. पॉलिश केल्याने बुटांचं ओलाव्यापासून सरंक्षण होतं. त्यामुळे थोडे पैसे बचवण्यासाठी कमी दर्जाचं पॉलिश आणू नका. 
 
* तुमच्या पायांना खूप घाम येत असेल तर बूट व्यवस्थित वाळवायला हवेत. यासाठी बूट काढल्यावर त्यात पेपर नॅपकिन किंवा टिश्यू पेपर ठेवा. काही वेळानंतर टिश्यू पेपर काढून टाका. बुटांना वास येऊ नये यासाठी आता पावडर लावा. 
 
* बूट काढल्यावर लगेच ते बूट रॅकमध्ये ठेऊ नका. ते काही काळ पंख्याखाली ठेवा. दिवसभर घातलेले बूट शू रॅकमध्ये ठेवल्यास त्यातून घाण वास येईल. बूट शक्यतो पेपरमध्ये गुंडाळून ठेवा. कापडाच्या शू कव्हरमध्ये टाकून मगच बूट बॉक्समध्ये ठेवा. यामुळे ते चांगले टिकतील. 
 
* बुटांना फंगस लागल्यास जुन्या ब्रशने त्यावर साबणाचं पाणी लावा. फंगस जाईपर्यंत ब्रश बुटांवर घासा. यानंतर बूट पंख्याखाली ठेवा. फंगस लागू नये यासाठी बूट काही काळ सूयप्रकाशात ठेवा.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

24 तास ब्रा घालता? जाणून घ्या हे 6 नुकसान

स्तनाच्या आरोग्य आणि योग्य शेपसाठी ब्रा घालणे आवश्यक आहे. याने फिगर सुंदर आणि शेपमध्ये ...

news

हनीमूनहून परतल्यावर मुलीने शेअर केल्या बेडरूमच्या सर्व गोष्टी - व्हिडिओ वायरल

काय तुम्ही तुमच्या आईशी खुलून सेक्सबद्दल बोलल्या आहात का? सेक्सवर बोलणे तुमच्यासाठी वाईट ...

news

डीप कंडिशनिंग पण जरा जपून

केसांची काळजी घेण्यासाठी डीप कंडिशनिंगचा पर्याय स्वीकारला जातो. यामुळे केसांना पोषण ...

news

डार्क कॉम्प्लेक्शनचे फायदे

अधिकश्या गव्हाळ रंगाच्या लोकांकडे हीनदृष्ट्या बघितलं जातं. परंतू डार्क कॉम्प्लेक्शन असलं ...

Widgets Magazine