शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (12:18 IST)

कसे कराल आपल्या चिमुरड्यांना लैंगिक शोषणाबद्दल शिक्षित?

दुनियाभरात अनेक तरुणांना लैंगिक शोषणाचे शिकार व्हावे लागतात. पालक मुलांना शक्यतोर सुरक्षा देण्याचा प्रयत्न करतात तरीही त्यांच्याबरोबर काही घडलं तर ते भावनात्मक रूपाने तुटून जातात. म्हणून जर त्यांना त्यांच्या वय आणि समजप्रमाणे याबद्दल शिक्षित करण्याची खूप गरज आहे. आम्ही येथे काही टिप्स देत आहोत ज्याने आपल्याला मुलांना समजवणे आणि त्यांना यापासून वाचवण्यात मदत करेल...
* सर्वात आधी आपल्या मुलांच्या वयाप्रमाणे त्यांना शिक्षित करा तरच ते लैंगिक शोषणाचा अर्थ समजू शकतील.
 
* आपल्या मुलांसोबत मैत्रीचे नाते निर्मित करा ज्याने तो आपल्याशी काहीही शेअर करण्यात घाबरणार नाही आणि कुठलंही त्रास असल्यास आपल्याला लगेच माहीत पडेल.
 
* आपल्या मुलांशी लैंगिक शोषणाबद्दल अगदी मोकळेपणाने बोला. त्यांना समजवा की यात तुमची चूक नाही म्हणून असे होत असल्यास लगेच आम्हाला कळवा.
 
* आपल्या मुलांना सुरक्षेबद्दल टिप्स द्या. जसे अनओळखी माणसांकडून काही वस्तू न घेणे, अनओळखी माणसाबरोबर विश्वास न ठेवणे इत्यादी.

* त्यांना सांगा की शरीरातील काही पार्ट्स प्रायव्हेट असतात. त्यांना याबद्दल योग्य तेवढी माहिती देऊन ते कसे जपावे याची माहिती द्या. त्यांना सांगा या पार्ट्सला कुणी हात लावत असल्यास हे चुकीचे आहे मग तो माणूस अगदी ओळखीचा का नसो.
 
* त्यांना सांगा की कोणीही प्रायव्हेट पार्ट्सला हात लावण्याचा प्रयत्न करत असेल तर जोराने ओरडावे. ज्याने लोकं एकत्र होतील आणि तुम्हाला सुटका मिळेल.
 
* असे वातावरण निर्मित करा की मुलं आपल्याशी कोणतेही सीक्रेट शेअर करेल. अनेकदा लैंगिक गुन्हेगार मुलांना म्हणतात की ही गोष्ट गोपनीय ठेवायला पाहिजे, हे कुणाला ही सांगता कामा नये आणि मग मुलं घाबरून पालकांना काही सांगत नाही.
* मुलांच्या अॅक्टिव्हिटीवर लक्ष देत राहावे. त्यांची वागणूक बदलत तर नाही, ते एखाद्या जागेवर जायला टाळतं तर नाही, किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल त्यांना राग तर वाटतं नाही, अश्या सर्व गोष्टींच्या मुळात जाऊन समस्या सोडवा.
 
* मुलांना सचेत करा की कोणीही त्यांच्यासोबत सतत टच करण्याचा किंवा जवळ घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना असे करायला मना करा किंवा आपला विरोध दर्शवणे गरजेचे आहे.