शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 9 ऑगस्ट 2018 (16:41 IST)

घर सजवताय ?

आजच्या धावपळीच्या युगात अनेकांना घराला नवीन लूक देणे हा प्रकार नेहमीच महागडा किंवा वेळ घेणारे मोठ्ठे काम, असा वाटतो. मात्र, सध्याच्याच घरात फक्त काही गोष्टी इकडल्या तिकडे किंवा भिंतींचे रंग बदलून टाकल्यास हवा तो फ्रेश लूक सहज येऊ शकतो. अशाच काही सोप्या व साध्या टिप्स जाणून घ्या.
 
संपूर्ण घर पांढर्‍या रंगाने रंगवून त्यावर आकर्षक रंगसंगती वापरुन विविध प्रकारच्या लटकवता येतील अशा वस्तू लावाव्या.
 
फॅमिली कोलाज- एखादी विशिष्ट भिंत सजवण्याची अगदी प्रसिद्ध पद्धत म्हणजे सारख्याच अथवा निरनिराळ्या फ्रेम्समधले कौटुंबिक फोटो लांबच लांब अशा भिंतीवर कोलाज करून लावणे. यासाठी पांढर्‍या रंगाच्या फ्रेममध्ये ग्रे रंगसंगती वापरून त्यामध्ये फोटो लावता येतील.
 
फर्निचर स्टाइल - घरात स्कॅन्डीनेवीयन प्रकारचे फर्निचर वापरल्यास घर उत्कृष्ट दिसते. विविध रंगाच्या सजावटीचा वापर करा.
डेकोरेटिव्ह पडदे- खिडक्यांसाठीचे पडदे आजकाल निरनिराळ्या स्टाइल्स घेऊनच बाजारात उतरले आहेत. यासाठी घरात पांढर्‍या किंवा बदामी रंगाचे सेमी ट्रान्सपरन्ट पडदे वापर करू शकता.
 
मल्टीपरपझ टेबल - घरात टेबलाचा भरपूर वापर करता येऊ शकतो. दिवसभरात काम करण्यासाठी, संध्याकाळी निवांत बसून गप्पा मारण्यासाठी आणि रात्री जेवताना त्याचा उपयोग होऊ शकतो.
 
मल्टीपरपझ कोच - घरात अशा पद्धतीचा कोच वापरावा की त्याचा सोफ्याप्रमाणेही वापर करता येईल तसेच गादीप्रमाणेही त्याचा उपयोग होईल. जेणेकरून इकडे तिकडे हलवायलाही सोपे होईल. 
 
अशा पद्धतीने घर सजविल्यास आपले घर आकर्षक आणि सुंदर दिसेल.