testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फ्रीजमध्ये पदार्थ ठेवण्यासाठी काही टिप्स

वेबदुनिया|
पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. परंतु, याचा अर्थ तो तिथेच पडून द्यावा असा नाही. 'स्मार्ट वूमन' फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये कोणते पदार्थ असायला पाहिजेत, यासाठी या काही नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील...
दूध :
कॅल्शियम वाढीच्या दृष्टीने सर्वांत उत्तम साधन म्हणजे दूध. प्रत्येक कुटुंबात दूध मुबलक प्रमाणात साठवलेले असते. मात्र, जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास दुधातील कस नाहीसा होतो. त्यातील पोषकतत्वे लोप पावतात. त्यामुळे फ्रीजमध्ये जास्त दिवस दूध ठेवू नये.

उकडलेले बटाटे व अंडी :
उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत. कारण कुठल्याही वेळी तुम्ही एग करी किंवा भुर्जी तयार करू शकता. उकडलेले बटाटेसुद्धा उपयुक्त ठरतात. अचानक येणारे पाहुणे किंवा मुलांना भूक लागल्यावर लगेचच तुम्ही सँडविच, भाजी, परोठे किंवा कटलेट तयार करू शकता. या दोन्ही वस्तू उन्हाळ्यात 2-3 दिवस आणि हिवाळ्यात किमान 1 आठवड्यापर्यंत खराब होत नाहीत.

:
लो फॅट बटर किंवा मार्जरीन फ्रीजमध्ये ठेवणे जरूरी आहे. हे ब्रेड किंवा सूप व पोळीवर लावून त्याचे वापर करू शकता.

:
फ्रीजरमध्ये हिरव्या मटरचे पॅकेट, ड्राय फ्रूट्स लहान लहान प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवायला पाहिजे. कारण कुठल्याही वेळेस खीर, कस्टर्डमध्ये त्यांचा वापर करता येतो.

लेमन ज्यूस, आलं-लसूण पेस्ट सुद्धा फ्रीजरमध्ये एका डब्यात घालून ठेवू शकता. सीझनला फळांची प्युरी बनवून फ्रीजरमध्ये ठेवण्यास हरकत नाही. गरजेनुसार त्याचा वापर करावा. चीजचे काप करून फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. पालक, मेथी इत्यादींना उकळून त्याची पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

परतलेला कांदा, पोळ्यांची कणीक, कोथिंबीर-मिरच्यांची चटणी, दही इत्यादी वस्तू फ्रीजमध्ये असायलाच पाहिजे. 2 भाज्या आधीच चिरून एअरटाइट डब्यांमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे. त्यामुळे घाईच्या वेळेस स्वयंपाक लवकर तयार होण्यास मदत मिळते.

इंस्टंट कॉफी, सूप, उपमा, इडली, लमोनेड इत्यादींचे सॅशे फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे.

वर दिलेल्या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवण्यास सुरू केल्या तर तुमचं काम अपेक्षेपेक्षा लवकर आवरेल. पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की फ्रीज हे फक्त फ्रीज आहे कचरापेटी नाही.


यावर अधिक वाचा :

#MahaBudget2018: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे….

national news
राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर, राज्याच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढला

Budget : सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला राज्याचा ...

national news
सागरी शिवस्मारकासाठी ३०० कोटींची तरतूद बाजार समित्यांमध्ये ई- ट्रेंडिगची सुविधा

राहणे, रोहितसोबत शिकला पण भारताविरुद्ध खेळला हा भारतीय

national news
क्रिकेटचे जग हे फारच वेगळे आहे. कसे कसे रेकॉर्ड बनतात, मोडतात आणि कधी कधी असे समीकरण ...

सर्वोच्च न्यायालयाची इच्छामरणाला अखेर परवानगी

national news
लिविंग विल अर्थात इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ...

स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत - सावित्रीबाई फुले

national news
समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून ...