testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

असा करा मायक्रोवेवचा वापर!

micro view
वेबदुनिया|
अनेकांचा असा गैरसमज असतो की मायक्रोवेवचा उपयोग फक्त गरम करण्यापुरताच असतो पण योग्य माहितीच्या अभावामुळे त्यांना त्याच्या उपयोगाची संपूर्ण माहिती नसते. तर जाणून घ्या मायक्रोवेवबद्दल संपूर्ण माहिती.

मायक्रोवेवमध्ये उपयोगात येणारे भांडे
मायक्रोवेवमध्ये साधारपणे अल्युमिनियम,प्लॅस्टिक, स्टील व सोनेरी सिल्व्हर लाइनवाल्या भांड्याचा वापर टाळायला पाहिजे. या भांड्यांचा उपयोग केला तर भांडे वाकडे होण्याची शक्यता असते. खराब होऊ शकतो. विशेष प्रकारची काचेची भांडी मायक्रोवेवप्रूफ असल्यामुळे त्यांचा उपयोग करावा.

मायक्रोवेवमध्ये तापमान सेंटीग्रेडमध्ये दिलेले असते. ते 900 सेंटीग्रेडपर्यंत असते. 900 सर्वोच्च, 700 उच्च, 450 मध्यम आणि 300 ते 180 कमी अशी त्याची श्रेणी असते. तुम्हाला एखाद्या रेसिपीसाठी सर्वोच्च तापमानातून वजा 50 तापमान करायचे असेल तर सर्वोच्च 850 सेंटीग्रेडला पदार्थ शिजवायला पाहिजे.

काही मायक्रोवेवमध्ये तापमान फॅरेनहाइटमध्ये दिलेले असते. त्यात सर्वाधिक तापमान 100 डिग्री, 80 डिग्री उच्च, 60 डिग्री मध्यम, व 40 ते 20 डिग्रीचे कमी अशी श्रेणी असते. तुम्हाला अन्न सर्वोच्च वजा 50 वर शिजवायचे असेल तर तुम्ही 50 डिग्रीवर शिजवू शकता.

कुठले अन्न कसे शिजवायचे?
250 ग्रॅम हिरव्या भाज्यांना पाणी न टाकता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मायक्रो करावे. भाज्यांचे प्रमाण दुप्पट असेल तर वेळ दुप्पट करण्याऐवजी दिलेल्या वेळात 1 मिनिट जोडून द्यावे.

4 बटाट्यांना एका पॉलिथिनमध्ये ठेवून त्यात दोन-तीन छिद्र करून 1 चमचा पाणी घालून 5 मिनिट मायक्रो करावे. बटाटे, गाजर, रताळी, बीन्स सारख्या भाज्यांना नेहमी स्टॅडिंग वेळ द्यावा अर्थात दिलेल्या वेळेच्या आधी ओवन उघडू नये.

दोन वाट्या कुरमुरे, पोहे यांना 1 ते 2 मिनिट शेंगदाणे, काजू, बदाम इत्यादींना अर्धा चमचा तेल व मीठ भुरभुरून 3 ते 4 मिनिट माइक्रो करायला पाहिजे.
ग्रेवी (मसालेदार रस्सा) तयार करण्यासाठी 1 चमचा तेल घालून कांदे, टोमॅटो, आले, लसूण यांची पेस्ट तयार करून 2 मिनिट मायक्रो करावे. नंतर त्यात टोमॅटो प्युरी व इतर साहित्य घालून 3 ते 4 मिनिट माइक्रो करावे.

मेथी, पुदिना, कोथिंबीरसारख्या हिरव्या भाज्यांना वर्षभर टवटवीत ठेवण्यासाठी 1 किलो मेथीला टर्न टेबल वर पसरावे. 5 मिनिटापर्यंत मायक्रो करावे. ओवनला उघडून परत चालवावे. याप्रमाणे 5-5 मिनिट वेळ देऊन मायक्रो करून त्यातील पाणी पूर्णपणे वाळवण्यासाठी 12-15 मिनिट मायक्रो करावे.

भात, पुलाव आणि बिर्याणी बनवण्यासाठी 1 कप तांदळाला 1 तास पाण्यात भिजवून ठेवावे. नंतर बाऊलमध्ये 2 कप पाणी, मीठ, 1 चमचा तूप व वेगवेगळ्या भाज्या आणि मसाले घालून 7 मिनिट माइक्रो हाय्येस्ट व 3 मिनिट मीडियम व 2 मिनिट झाकण ठेवून मायक्रो करावे.

शेंगदाणे, मुरमुरे व मेवा चिकी बनवण्यासाठी 1 वाटी गुळाला 1 चमचा तुपासोबत 4 मिनिट मायक्रो सेकंद हाय तापमानावर ठेवावे. नंतर सव्वा वाटी इच्छित वस्तू घालून मिश्रणाला एकजीव करून चिक्या पाडाव्यात.

(दाल) बाटी, केक, बिस्किट, माफीस, हांडवा इत्यादी कन्वेक्शन मोडमध्ये ओवनला 10 मिनिट प्री-हीट करून 20 मिनिट पर्यंत 220 डिग्री तापमानावर लो स्टॅडवर ठेवून शिजवावे.

ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी चार ब्रेडचे पीस घेऊन हाई रँकवर 250 डिग्री सेंटीग्रॅडवर 4 ते 5 मिनिट एकीकडे व 3 ते 4 मिनिट दुसरीकडून शेकावे.

पनीर टिक्का, बेक वेज सारख्या भाज्यांना ग्रिल किंवा कन्वेक्शन वर 10 ते 15 मिनिटापर्यंत बेक करावे.

पिझ्झा, बेक समोसा, खारी इत्यादींना 10 मिनिटापर्यंत प्री-हीट केलेल्या ओवनमध्ये 15 मिनिटापर्यंत बेक करावे.


यावर अधिक वाचा :

चंदिगडमध्ये लग्नाआधी मुलाची डोप टेस्ट होणार

national news
आता लग्न ठरवताना मुला-मुलीच्या पसंतीसोबतच मुलांची डोप टेस्ट देखील होणार आहेत. चंदिगड ...

भोंदूबाबाकडून १२० महिलांवर बलात्कार

national news
हरियाणा पोलिसांनी ६० वर्षांच्या एका भोंदूबाबाला १२० महिलांवर बलात्कार केल्याच्या ...

५० वर्षापूर्वी विमान अपघातात ठार झालेल्या सैनिकाचा मृतदेह ...

national news
हिमाचल प्रदेशच्या लाहौल खोऱ्यात गिर्यारोहकांना ५० वर्षांपूर्वीचे अपघातग्रस्त विमानाचे ...

पुण्यात इमारत कोसळली, पाच जणांना वाचवले, अनेक अडकले ...

national news
महाराष्ट्राच्या पुण्यातील मुंढवा येथील केशवनगरजवळ एक इमारत कोसळण्याची बातमी आहे. ...

मिठीचा स्वीकार करायला मोदींना काय हरकत होते ? राज यांचा

national news
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारली. या मिठीमुळे मोदींसहीत ...