testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

पावसाळ्यामध्ये कपडे स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी

clothes in rain
Last Modified मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (14:56 IST)
सध्या सगळीकडेच पावसाने जोर धरला आहे. पण त्यामुळे आपली कामे काही थांबत नाहीत. अगदी शाळेमध्ये जाणार्‍या चिमुरड्यांपासून, ते काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पावसाला तोंड द्यावे लागत आहे. पावसाच्या हलक्या सरी असोत, किंवा धोधो कोसळणारा पाऊस असो, आपण पाऊस थांबण्याची वाट न पाहता, रस्त्यातील खड्डे, पावसाचे साचलेले पाणी, चिखल, ह्यांना तोंड देत आपापल्या कामांमध्ये गुंतत असतो. हे कपडे स्वच्छ धुणे, ही एक कसरतच असते. त्यातून हवा ओलसर, दमट असल्याने आणि ह्या दिवसांमध्ये उन्हाने दडी मारल्याने, धुतलेले कपडे सुकणे हाही मोठाच प्रश्र्न असतो. त्यातून जर कपडा जाडसर असेल आणि तो व्यवस्थित सुकला नसेल तर कपडा स्वच्छ धुतलेला असूनही त्यातून एक प्रकारची कुबट दुर्गंधी येऊ लागते. थोडक्यात सांगायचे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कपडे स्वच्छ धुणे आणि ते दुर्गंधीमुक्त ठेवणे हे जरा अवघड काम होऊन जाते. तसेच कपाटातल्या कोरड्या कपड्यांनाही हा वास येऊ लागतो. हे टाळण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करता येईल.
कपाटामध्ये असलेल्या भरजरी साड्या किंवा अन्य किमती कपडे दमट हवेमुळे येणार्‍या दुर्गंधीपासून मुक्त राहावेत ह्यासाठी ह्या कपड्यांना साडी बॅग्जमध्ये व्यवस्थित ठेवणे हा चांगला पर्याय आहे. तसेच अधून मधून हे कपडे कपाटाबाहेर काढून त्यांना थोड्या खुल्या हवेवर राहू द्यावे. त्यामुळे ह्या कपड्यांमध्ये असणारा थोडाफार दमटपणाही निघून जाण्यास मदत होईल. तसेच कपाटाची दारेही काही वेळ खुली राहू देत त्यामध्ये हवा खेळू द्यावी. कपाटामध्ये आणि आपण आपल्या कपडे ठेवतो त्या स्टोरेज बॅग्ज मध्ये डांबराच्या गोळ्या असाव्यात.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

चिडे : चव दक्षिणेची

national news
तांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...

सुगंधी निलगिरीचे गुण

national news
संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.

अल्झायमरवर कॉफी हे रामबाण उपाय

national news
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे चिंतनशक्तीवर त्याचे दडपणही वाढत जाते. यावर अनेक उपचार असले ...

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी हे करून पाहा!

national news
आवळ्याचा चमचाभर रस, जिरे व खडीसाखर यांचे मिश्रण सकाळ, संध्याकाळ दोन-तीन दिवस घेतल्यास ...

टोमॅटोची लाल चटणी

national news
प्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे व त्यातच खजुराचे तुकडे करून घालावे. टोमॅटो व खजुराचे मिश्रण ...