शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

Try This : महत्त्वाचा कानमंत्र

बोरे, अंजीर, पेरू यामध्ये अळ्या असण्याची शक्यता असते. म्हणूनच ही फळे धुऊन, कापून खावीत.
 
तेलकट कपडे धुताना पाण्यात साबणाबरोबर २-४ चमचे साखर टाकावी आणि त्यात कपडे भिजवावेत. यामुळे तेलकटपणा लगेचच जातो.
 
फ्रीज साफ करताना कोमट पाण्यात थोडा सोडा घालून मऊसर कपड्याने पुसून घ्यावा. यामुळे फ्रीज स्वच्छ होतो.
 
सिल्कचे ब्लाऊज सौम्य शाम्पूने धुवावे. म्हणजे रंग जात नाही आणि खराबही होत नाही.
 
केराच्या बादलीत थोडेसे फिनेल शिंपडून ठेवल्यास घाण वास येत नाही आणि त्याभोवती चिलटे घोंगावत नाहीत.
 
केसांवर अथवा कपड्यांवर च्युईंगम चिकटले असल्यास त्यावर बर्फाचा खडा फिरवावा. यामुळे चिकटलेले च्युईंगम लगेचच निघते.