शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

किचन कसे स्वच्छ ठेवाल?

घरातील दिवाणखान्याप्रमाणेच स्वयंपाक घराची (किचन) स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वयंपाक घरातील नीटनेटकेपणा व रचना यावरून त्या घरातील गृहिणीकडे पाहिले जाते. स्वयंपाक झाल्यानंतर सकाळ- संध्याकाळी स्वयंपाक घराची स्वच्छता केली पाहिजे. 

डायनिंग टेबलवर टेबलमॅट्स जुनी झाली असल्यास बदलावीत. फ्रिज व शेल्फवरील वृत्तपत्रे बाजुला करून त्या जागी नवीन मॅट्स लावावी.

नॉनस्टिक कुकवेअरवरील डाग काढण्यासाठी 2 मोठे चमचे बेकिंग सोडा, अर्धा कप व्हिनेगर व 1 कप पाणी टाकून 10 मि‍निटे उकळत ठेवा.

स्लॅब व गॅसची स्वच्छता करण्यासाठी नायलॉनच्या जुन्या मोज्यांचा वापर करा.

स्वयंपाक घरात नेहमी लागणारी उपकरणे (उदा. मिक्सर, ग्रायंडर, माइक्रोवेव्ह व स्विच बोर्ड) स्वच्छ करण्यासाठी 2 लहान चमचे लिक्विड ब्लीच मिसळून स्वच्छ मुलायम कपड्याने पुसावे. ते नवीन दिसतील.

स्टेनलेस स्टीलची सिंक स्वच्छ करायची असेल तर कणकेत मिथेलेटेड स्प्रिट मिसळून सिंकमध्ये टाकून द्यावे व ते सुकल्यानंतर स्वच्छ करावे.