शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

केसांसाठी घरगुती शॅम्पू

तेलकट केसांसाठी 
दोन चमचे शिकेकाई पावडर, एक चमचा हिरव्या चण्याची पावडर, अर्धा चमचा मेथी पावडर एकत्र करून चांगले मिश्रण तयार करावे. केसांना लावायच्या आधी मिश्रणात अंड्याचा पांढरा बलक घालून तो केसांना शॅम्पोप्रमाणे लावाला. हा शॅम्पो केसांना लावल्यानंतर फेस येत नाही पण केस स्वच्छ होतात.

एक ग्लास रिठे, चार ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवावे. सकाळी हे पाण्यात कुस्करा व पाणी गाळून घ्या. या पाण्यात एक चमचा शिकेकाई पावडर मिसळून त्याने केस धुवा. केसा चमक येते.

टोनिंग लोशन
ग्लासभर पाण्यात एक मोठा चमचा लाल व्हिनेगर व चिमूटभर मीठ टाकून चांगल हालवा. या मिश्रणाने केसांच्या मुळांना हळुवार मसाज करा. एका तासाने केस धुऊन ‍नंतर विंचरल्याने केस मऊ होतात.

 
WD
कोरड्या केसांसाठी शॅम्पू
एक ग्लास दुधात एक अंड फेटुन घ्या. मिश्रणात भरपूर फेस आल्यानंतर केसांना चांगल्या प्रकारे लावा. पाच मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनवेळा हा प्रयोग नक्की करा.

एका नारळाच्या दुधात दोन चमचे चण्याचे पीठ किंवा एक लहान चमचा शिकेकाई पावडर मिसळा. केस व केसांच्या मुळांना हे मिश्रण चांगल्याप्रकारे लावा. पाच मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवा.