शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : मंगळवार, 24 जून 2014 (15:07 IST)

खुलवा बागेचे सौंदर्य

पावसाळ्यात बागेचं सौंदर्य खुलून येतं. पावसाच्या पहिल्या चार-पाच सरीतच बाग टवटवीत आणि सतेज दिसू लागते. मात्र रोपांची योग्य काळजी न घेतल्यास किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते.

म्हणूनच या दिवसातही बागेची काळजी घ्या. काडेपेटीतील चार-पाच काड्या गुलाच्या बाजूनं कुंडीत खुपसून ठेवा. यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव टळतो. ऑम्लेट केल्यानंतर उरलेली अंड्याची टरफले पाण्यात टाकून ठेवा. रात्रभर ती पाण्यात राहिल्यावर सकाळी ते पाणी झाडांना घाला. हे उत्तम खत आहे. वेळेत झाडाचं कटिंग करून घ्या. यामुळे भरपूर फुले येतील. झाडाला कीड लागली असल्यास बागेतील लॉनमध्ये विषारी झाडे एकत्र करा आणि ती वाळल्यावर बागेतच जाळा. या धुराने कीडे मरतात. घरात ठेवलेल्या झाडांवर महिन्यातून एकदा जिलेटिन पावडर शिंपडा. यामुळे झाडे तजेलदार राहतात.