शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

गरोदरपणाच्या वेळेस प्रवास -2

विमानात प्रवास करताना पाय लांब करता येतील अशी जागा घ्यावी. रेस्टरूम तुमच्या जागेच्या जवळच असायला पाहिजे. कारमध्ये प्रवस करताना सीट बेल्ट पोटाच्या खाली बांधावा. कारच्या पुढच्या सीटवर बसावे आणि स्वच्छ हवेसाठी खिडकी उघडीच ठेवावी. 

ट्रेनमध्ये प्रवास करताना रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी, सूज पासून बचावासाठी पायांना सारखे हालवत राहावे. ट्रेनमध्ये चालण्या फिरण्यासाठी बरीच जागा असते. ट्रेनमध्ये सीटला पाठ टेकून बसायला पाहिजे.

समुद्री प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला उलटी किंवा मळमळ जाणवते. प्रवासाच्या आधी हे जाणून घेणे फारच जरूरी आहे की जहाजात डॉक्टर आहे की नाही? तशी तर समुद्रातील प्रवास सुरक्षित मानण्यात येतो.