शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

घामामुळे परेशान आहात?

दमट हवामानामुळे ऑफिस असो वा डेटिंग प्लेस स्त्रिया व पुरूष आपल्या रुमालाने घाम पुसताना दिसतात. कित्येकदा काख येथून घाम कपड्यामध्ये शिरतो आणि बॉडी दुर्गंधामुळे लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरा जावं लागतं.

हे काही टिप्स अमलात आणून आपणही सुगंधित काया प्राप्त करू शकता:

* गार पाण्याने अंघोळ केल्याने दमटपणा कमी होतो. जर वेळ नसेल तर फक्त काख आणि पाय स्वच्छ धुऊन घ्या.

अँटी बॅक्टीरियल साबणाने अंघोळ करा.


* वेळेवारी अंडरआर्म्स शेव करत राहा.
 
* नेहमी स्वत: जवळ एक चांगले अँटीपर्सस्पिरेंट ठेवावे. डियो फक्त वास दबवण्याचे काम करतो पण अँटीपर्सस्पिरेंट आणि डियोचे कॉम्बिनेशन उत्तम पर्याय आहे.


* बॉडी फोल्ड्सच्या ठिकाणी बेकिंग सोडा लावा. हे अँटी बॅक्टीरियल असतं. हे फक्त स्किन ड्राय असतानाचा अप्लाय करा.
 
अब्सॉर्बेंट पाउडर लावणे ही चांगले विकल्प आहे.


* वर्कआउटच्या वेळी हायटेक सिंथेटिक फॅब्रिक निवडा.
 
* थोडेसे सैल कपडे घाला ज्याने वारं येण्यासाठी जागा मिळेल.


* डेटवर जायचं असेल तर मसालेदार फूड किंवा तीव्र सुगंध असणारे पदार्थ खाणे टाळा.
 
* अल्कोहल आणि निकोटीन घेणे टाळा.