शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

डिझायनर स्टडी टेबलची क्रेझ!

आजकाल डिझायनर स्टडी टेबलची खूप चलती आहे. आईवडिलांबरोबर जाऊन मुलं आपल्या पसंतीचं स्टडी टेबल खरेदी करू शकतात.

तुमच्या जवळ जर एखादं जुनं स्टडी टेबल असेल आणि ते चांगल्या अवस्थेत असेल तर त्यानंही काम चालू शकतं. फक्त प्रश्न असतो की ते सजवायचं कसं? तज्ज्ञ सांगतात की, स्टडी टेबलवर पुस्तकांचा रॅक, पेन स्टँड किंवा फोल्डर ठेवण्याऐवजी ते टेबलाच्या कडेला असलेल्या भिंतीला टांगून ठेवावेत. नाहीतर अभ्यास करताना या वस्तूंकडे मुलांचं लक्ष जाऊ शकतं. अनेक ड्रॉवर आणि ट्रे असणारं टेबल मुलांसाठी फायदेशीर ठरतं. यात मुलांचं आवश्यक सामान योग्य प्रकारे ठेवता येतं. मुलं अभ्यासाला बसणारी खुर्चीही साधी आणि आरामदायक असावी. ती जर खुर्ची खूप टणक असेल तर अभ्यास करताना मुलांची पाठ दुखू शकते.