शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

ताजी राखा रोपं !

घरातली रोपं दीर्घकाळासाठी ताजीतवानी ठेवण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

1. पाण्याच्या बाटलीत मनीप्लांट ठेवला असेल तर त्यातील पाणी रोज बदलणे गरजेचे आहे.

2. चहा बनवल्यानंतर चोथा फेकण्याऐवजी तो गुलाबाच्या किंवा मनीप्लांटमध्ये टाकायला हवा, तो झाडांसाठी खत म्हणून काम करेल.

3. खोलीत ठेवलेल्या रोपांनासुद्धा प्रकाशाची गरज असते, म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी त्या रोपांना सूर्यप्रकाशात ठेवायला पाहिजे.

4. माशाच्या काट्यांना रोपांच्या मुळांत टाकायला हवे. त्यामुळे योग्य प्रमाणात मीठ मिळेल.

5. जास्त पाणी दिल्यास रोपांची मुळे खराब होतात म्हणून रोपांना गरज असते तेवढेच पाणी द्यायला पाहिजे.

6. रोपांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी फांद्यांना कापत राहावे. त्याने रोप लवकर वाढते.

7. आठवड्यातून एक दिवस रोपांच्या बाजूची माती खोदून त्यात पाणी टाकायला पाहिजे. त्याने मुळांना वाढ आणि पाणी व्यवस्थित मिळू शकेल.