बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

दुर्गंधी कपडे असे धुवावे...

रोज घालण्यात येणारे कपडे धुताना आपण सावध असतो की किती पाऊडर वापरायची किंवा कोणते कपडे मशीनमध्ये तर कोणते हाताने धुवायचे आहे. पण व्यायाम करताना घातलेले कपडे धुताना आपण एवढा विचार करता का? व्यायाम करताना पूर्ण शरीर घामाने चिंब भिजतं म्हणूनच हे कपडे धुताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
 
घाम म्हणजे जर्म्सचा धोका, आणि म्हणूनच हे धुण्यासाठी अधिक डिर्जेंट वापरणे आपल्या हातासाठी किंवा मशीनसाठी नुकसानदायक असू शकतं. म्हणूनच हे कपडे धुण्याच्या 10 ते 15 मिनिटांपूर्वी गार पाण्यात एक कप व्हिनेगर मिसळून यांना भिजवून ठेवावे. यानंतर कमीत कमी प्रमाणात डिर्जेंट वापरून हे धुवावे, याने दुर्गंधही दूर होईल आणि जर्म्सचा धोका राहणार नाही.