गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

पडद्यांमुळे घराचे सौंदर्य खुलते!

पडद्यांमुळे घराचा चेहरामोहरा बदलून जातो. हल्ली प्रिटेंड पडद्यासोबत गोप पडदे (कर्टन) आणि मोत्याचे पडदेही बाजारात उपलब्ध आहेत.

पडद्यांचे विविध प्रकार :

बाजारात पडद्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. प्रिंटेड व प्लेन कापडही मिळते. आपण त्यापासून विविध डिझाईनममध्ये पडदे शिवून दारे-खिडक्यांना लावू शकतो. याशिवाय वेलवेट, पॉलिस्टर क्रॅश, कॉटन-सिंथेटिक मिक्स मटेरियल आदींमध्ये पडदे उपलब्ध होतात. बाजारात रेडीमेड पडदेही उपलब्ध असतात. काही जण घरता धुळ येऊ नये म्हणूनही पडदे लावतात, तर काहींचा हेतू असतो सजावटीचा.

मोत्याचे पडदे :
सध्या मोत्यांच्या पडद्याची क्रेझ आहे. ते रेडीमेडही मिळतात. सुंदर, रंगबिरंगी मोत्याच्या माळा त्यात लावलेल्या असतात. या पडद्याची किंमत साधारण 550 ते 750 रुपयांपर्यंत असते.

कॉटन-सिंथेटिक मिक्स मटेरियल :
पडद्याचे कॉटन-सिंथेटिक मिक्स मटेरियल 60 रुपये ते 250 रु. प्रती मीटर असते. कॉटन- सिंथेटिक मिक्स मटेरियलमध्ये आपल्याला सुंदर फ्लॉवर प्रिंट व लायनिंगचे पडदे मिळतील. हे पडदे मध्यमवर्गीयांची पहिली पसंती आहे.

वेलवेटचे पडदे :
वेलवेटचे पडदे फारच मऊ असतात. प्रिंटेड व प्लेन अशा दोन्ही प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. मात्र हे पडदे फारच महागडे असतात. 225 रुपये प्रती मीटरपासून यांची किंमत सुरू होते.

पॉलिस्टर क्रॅश मटेरियल :
पडदे सुळसुळीत असल्यामुळे याला क्रॅश मटेरियल म्हणतात. याचे प्लेन पडदे बाजारात उपलब्ध असतात. या पडद्यांची किंमत 100 रुपये प्रती मीटरच्या आसपास असते.

विस्कोम गोप कर्टन :
एक प्रकारचा हा रेडिमेड पडदा आहे. जाड दोर्‍यांपासून तो तयार करण्यात येतो. हे पडदे दिसायला फारच सुंदर असतात. मग आता या तुम्ही सुंदर रंग-बिरंगी पडद्याने दार-खिडक्या सजवून घराला नवीन 'लुक' देण्याचा प्रयत्न कराला ना?