शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

फर्निचर खरेदी करण्‍यापूर्वी काही टिप्स!

WD
घर खरेदी केल्यानंतर ते कशा प्रकारे सुंदर करता येईल, या विचारात आपण असतो. आपण सगळ्यात आधी फर्निचर खरेदी करण्याचा विचार करतो. परंतु फर्निचर कसे घ्यावे, फर्निचर रेडिमेड घ्यावे की, बनवून घ्यावे त्यात ते लाकडाचे घ्यावे की मेटलचे घ्यावे की फायबरचे घ्यावे अशा प्रश्नानी आपण द्विधावस्थेत सापडतो. परंतु आता चिंता सोडा आणि खाली दिल्या टिप्स फर्निचर खरेदी करण्‍यापूर्वी वाचा...

* लाकडी फर्निचर फार टिकावू असतात. परंतू ते जास्त वजनदार व महाग असतात. त्यामुळे ते खरेदी करण्याऐवजी बाजारात उपलब्ध झालेले मेटलमध्ये रेडिमेड आलेले फर्निचर देखील खरेदी करू शकतात. त्यांना आपण पाहिजेतर वूडन सारखा रंग देऊ शकतो. तसेच आता बाजारात आलेले फायरबोर्डचे फर्निचर ही आकर्षक दिसतात. त्याने घराची ही शोभा वाढते.

* बांबू व वेताच्या काड्या वाकवून त्यापासून तयार केलेले फर्निचर ही आपले लक्ष वेधत असतात. तसेच फोममध्ये ही फर्निचर उपलब्ध असतात. परंतु आपल्या घरात लहान मुले असतील तर फोमचे फर्निचर लवकरच खराब होत असते. तसेच अशा फर्निचरसाठी जास्त जागा लागत असते.

* मोठ्या मॉलमध्ये स्टाक क्लिअर करण्यासाठी सेल लावले जात असतात. 'एकवर एक फ्री' किंवा 50 टक्के ऑफच्या स्किम सुरू असतात. बाजारात सुरू असलेल्या योजनाची आपल्याला माहिती मिळण्यासाठी आपर दररोज वृत्तपत्र वाचले पाहिजे. तसेच बाजारात फिरताना अशा मोठ्या फर्निचर मॉलकडे लक्ष दिले पाहिजे.

* फर्निशिंग आपल्या घराला घरपण देण्यास मदत करत असते. फर्निचर खरेदी करताना चांगली डिझाईन व क्वालिटी पाहूनच खसेदी करा. तसेच कमी पैशात मिळत असलेले फर्निचर खरेदी करण्यापूर्वी वस्तू चांगल्या निरखून पाहिल्या पाहिजे नाही तर स्वस्त वस्तू आपल्याला महागात पडू शकतात.