गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

भाड्याच्या घरात रहाताना

घर हे कुटुंबियातील सर्वांचे एक आपले ठिकाण असते. दगडा-विटांची ती वास्तू नसते. त्यात प्रेम-जिव्हाळा यांच्या नाजूक धाग्यांनी विणलेली ती कलाकृती असते. त्यात रूक्षता नसते, मायेचा ओलावा असतो. पण या मायेबरोबरच काही भौतिक गोष्टींनीही घर सुंदर रहाते. पण अनेकदा भाड्याच्या घरात रहाताना घराला सौंदर्य देता येत नाही. त्यासाठी खाली दिलेल्या टिप्स घर सुंदर ठेवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतील.

*तुमचा पलंग किंवा दिवाण पेटीच्या रूपात बनवा. त्यामुळे बदली झाल्यास तो हलविण्यास फार त्रास होत नाही. शिवाय त्याच्या आत सामानही ठेवता येते.

*शो पिस घेताना ते नाजूक नाही याची काळजी घ्या. म्हणजे बदली झाल्यास हलविताना तो तुटण्या-फुटण्याची शक्यता नसते.

*तुमची मुले भिंतीवर लिहित असतील तर घरातील एका खोलीत काळा फळा लावा. म्हणजे ते त्यावर काही लिहू शकतील.

*घरातील अडगळीच्या वस्तू साठवून ठेवू नका. त्यामुळे उगाचच अडचण भासते व घर लहान वाटू लागते.

*भाड्याच्या घरात भिंतीतल्या कपाटांना दरवाजे नसतील तर लावून घ्या. त्यामुळे तुमचे सामान सुरक्षित राहू शकेल.

*भिंतींवर खिळे शक्यतो ठोकू नका. ते वाईट दिसतात. शिवाय घरमालकांना आवडत नाही ते वेगळेच. त्याऐवजी बाजारात भिंतीला चिकटणारे एंगल मिळतात. त्याचा वापर करा.