शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

भिंतींचे सौंदर्य खुलवताना..

- स्वाती

गृहसजावटीमध्ये भिंतींचं सौंदर्य सर्वाधिक महत्त्वाचं असतं. याचं कारण घरामध्ये प्रवेश करणार्‍या व्यक्तीचं लक्ष सर्वप्रथम भिंतींकडे जातं. त्यामुळेच फ्लोअरिंग, छत आणि इतर सजावटीचा विचार करताना भिंतींच्या सजावटीकडे दुर्लक्ष होता कामा नये. भिंतींना सुंदर बनविण्यासाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत; भिंतींकडे एक रिकामा कॅनव्हासप्रमाणे पाहावे. असा कॅनव्हास ज्यावर आपण मनातली चित्रं काढू शकतो आणि ती सर्वासमोर ठेवू शकतो. सध्याच्या काळात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वापरून तुम्ही आपल्या कलात्मकतेने घराच्या भिंतींचे सौंदर्य खुलवू शकता. आज भिंती या प्लास्टर, स्टँड, पेंटेड आणि पेपर रुम वापरून तयार केल्या जातात. भिंतींना सुंदर बनविण्यासाठी आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत; पण तरीही भिंतींना खास बनविण्यासाठी आपण आपल्या घराच्या भिंतींना एक रिकामा कॅनव्हासप्रमाणे पाहावे. असा कॅनव्हास ज्यावर आपण आपल्या मनातली चित्रं काढू शकतो आणि त्यांना सर्वासमोर ठेवू शकतो. जर तुम्हाला असंच काहीसं करायचं असेल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
भिंतींना पेंट करताना..

PR
भिंतींना पेंट करताना.. भिंतींना पेंट करताना हे पाहावे लागेल की, ती कशाची बनलेली आहे. जर भिंतींना काही चिरा पडल्या असतील किंवा ओरखडे पडले असतील तर तुम्ही त्याला योग्य प्रकारे फिनिशिंग करू शकता. त्यासाठी तुम्ही प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा वॉलपुट्टीचा वापरही करू शकता. जर भिंतीची अवस्था खूपच खराब झाली असेल तर प्रोफेशनल मिस्त्रीकडून त्याची योग्य प्रकारे डागडुजी करणे आवश्यक आहे. याखेरीज भिंती या जिप्सम बोर्ड किंवा ड्राय वॉलच्या पातळ कव्हरनेही तुम्ही झाकू शकता.

PR
फिनिशिंग.. भिंतींना सुंदर फिनिशिंग देण्यासाठी त्यांना रंग देणे ही एक चांगली आणि स्वस्त पद्धत आहे. पेंट किंवा रंग हे मुळातच एक अपारदर्शी माध्यम आहे. भिंतींना झाकणे हाच याचा उद्देश असतो. सध्या शेकडो रंग उपलब्ध आहेत. त्यापैकीच एखादा वेगळा रंग तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींसाठी निवडू शकता. इतकंच काय पण फॉक्स फिनिश टेक्निकने तुम्ही एकाच रंगाच्या वेगवेगळ्या शेडस् आपल्या आवडीनुसार वापरू शकता.
PR
रंगांची निवड.. फिकट आणि डोळ्यांना थंडावा देणार्‍या रंगामुळे रुम मोठय़ा वाटतात. अशा प्रकारचे रंग हे छोटय़ा रुमसाठी किंवा ज्या भिंतीमुळे घराचे अनेक भाग झाले आहेत अशा भिंतींना जर सौम्य रंग दिले तर ते खुलून दिसतात. गडद किंवा चटपटीत रंग हे मोठय़ा आकाराच्या रुमसाठी चांगला पर्याय आहे. तसेच ज्या भिंतींना फिनिशिंगची गरज आहे तेथेही तुम्ही गडद रंग वापरू शकता. जर एखाद्या मोठय़ा रिकाम्या रुममध्ये प्रकाश कमी येत असेल तर तेथे सौम्य चमकणारा रंग तुम्ही वापरू शकता.

ज्या भिंतींवर रंगांचे पॅच आहेत ते जर अंधार्‍या कोपर्‍यात असतील तर त्यावर उजेड पाडून तुम्ही त्या रंगांचा प्रभाव पाहू शकता. तसेच ज्या रंगाचा पेंट आहे त्याच्याशी मिळत्या जुळत्या अँक्सेसरीज आणि फॅब्रिक असणे महत्त्वाचे आहे. या वस्तू रंगाचे पॅच ज्या भिंतीवर आहेत त्याच्या समोर ठेवून त्या योग्य आहेत की नाहीत हे पाहू शकता.