गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

मंत्र आकर्षक गृहसजावटीचा

फर्निचर : खोलीतील टीव्ही व म्युझिकसाठीचे कपाट व इतरही फर्निचर बोजड करू नये. कमी उंचीचं व कमी खोली असणार्‍या फर्निचरमुळे आहे ती जागा मोठी वाटते. टीव्हीसाठी ट्रॉली ठेवली तरीही हरकत नाही. कारण युनिट केलं की ते टीव्हीसाठी उगाचच मोठं करावं लागतं.

सोफासेट अथवा दिवाण हे रात्री पलंग म्हणून उपोगात आणता येतील, असेच करावेत. त्यांची उंची कमी ठेवावी व त्यावरील कापडाचं डिझाईन प्लेन रंगाचं असावं. त्याचप्रमाणं सोफा अमेरिकन पध्दतीचे न घेता लाकडाच्या हातांचे लहान व खाली जमिनीला न टेकणारे घ्यावेत म्हणजे खालून फरशी स्वच्छ ठेवता येते.

WD
पुस्तके : शोभेच्या वस्तू व कुटुंबीयांचे कलागुण ज्यातून दिसून येतात. अशा वस्तू या खोलीत जरुर ठेवाव्यात. पण सर्व वस्तू एकाच वेळी दाखवण्याचा हट्ट नसावा. आपल्याचसाठी एखाद्या दिवाणाच्या खालच्या ट्रॉलीमध्ये या वस्तूंसाठी संग्रह करुन ठेवावा. वस्तू आलटून पालटून लावण्यामुळे घराच्या सजावटीत कायम नावीन्य राहाते. स्वतंत्र ग्रंथघर असलं तरी काही निवडक पुस्तकं दिवाणखान्यात जरुर मांडावीत.