बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

मुलांना लावा या सवयी

प्रत्येक पालक मुलांच्या आवडीनुसार चालण्याचा प्रयत्न करतात मग ती मुलांना आवडणारी स्टेशनरी, टॉयज किंवा फूड आयटम्स का नसो. पण त्यांना हे सगळं घेऊन देताना लक्ष असू द्या की आपल्या मुलांच्या मनात स्पर्धेची भावना तर निर्मित होत नाहीये. अशाने त्यांच्या मित्रांबरोबर त्यांची वागणूक बदलू शकते.
 
* मुलांना शिकवा की त्यांची वस्तू सर्वात चांगली असली तर शाळेतील इतर पोरांच्या वस्तूदेखील छान आहे आणि कोणाच्या कोणत्याही वस्तूला वाईट म्हणणे चुकीचे आहे.
 
* आठवड्यातून एखादा दिवस सोडून मुलांच्या डब्यात रोज पोळी-पराठा आणि भाजी देणे योग्य ठरेल. आपली आयपत असली तरी बाजारातील आयटम्स देण्याने इतर मुलं उपेक्षित होऊ शकता आणि आपल्या मुलांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
 
* नेहमी मुलांमध्ये शेअर करून खाण्याची सवय टाका.
 
* कहाणीच्या रूपात नेहमी मुलांना हे सांगण्याचा प्रयत्न करावा की कोणाचीही टिंगल टवाळी करणे किंवा कोणाचाही अपमान करणे चुकीचे आहे.