गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

मॉड्यूलर किचन

WD
सध्या मॉड्यूलर किचनची फॅशन आहे. यात तोडफोड न करता किचनला आधुनिक रूप देऊ शकता. हे स्वयंपाक घर दिसायला आकर्षक व सुंदर दिसतं. हे किचन अशा प्रकारे डिझाइन केले जाते की त्यात जास्तीत जास्त सामान कमीत कमी जागेत बसवता येते. तुम्हीसुद्धा तुमच्या स्वयंपाकघराला नवीन लुक देण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

किचन बनवताना लागणारे सामान पाणी व आगीपासून बचाव करणारे असायला पाहिजे.

हँडल, ड्रायर, स्लाइडस ही हार्डवेअर चांगल्या क्वालिटीची हवीत.

स्वयंपाकघरात सामान ठेवण्यासाठी भरपूर स्टोरेज स्पेस असायला हवी.

किचनची देखभाल सोपी हवी. बेस युनिटबाहेर निघणारी व ट्रॉलीच्या आकाराची असल्यास त्याची साफसफाई व्यवस्थित करू शकाल.

किचनचे स्लँब किंवा प्लॅटफॉर्म तुमच्या उंचीनुसार असायला हवे. जास्त उंच किंवा जास्त खाली नको. दोन्ही परिस्थितीत काम केल्याने थकवा येतो.

डिश वॉशरच्या खाली एक प्लॅटफॉर्म बनवावा. तो 6 इंच असावा. यात भांडे धुतल्यास कमरेवर भार पडत नाही.

स्वयंपाकघर हवेशीर आणि भरपूर प्रकाश असलेले असावे. तिथे एक्झॉस्ट फॅन जरूर लावावा.