बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : बुधवार, 18 जून 2014 (12:05 IST)

मोबाईल बिलात बचत कशी कराल?

योग्य प्लॅनची निवड करा- जर तुम्ही मोबाईलवर जास्त बोलत असाल तर स्वस्त कॉलदर असणारा प्लॅन निवडा. जर तुम्ही कमी बोलत असाल आणि इंटरनेटचा प्रयोग करत असाल तर डाटा कार्डही सोबत घ्या. 
 
टोल फ्री कॉल करू नका- टोल फ्री कॉल फक्त लँडलाईन फोनसाठी मोफत असतात. जर तुम्ही हा क्रमांक मोबाईलवरून लावत असाल तर त्याचा दर तुम्हाला द्यावा लागेल. 
 
कुटुंब आणि मित्रांसह सर्वांचे नेटवर्क शक्यतो एकच असले पाहिजे. लक्षात असू द्या अनेक कंपन्या एकाच नेटवर्कसाठी मोफत कॉलची सुविधा देत असतात. 
 
अर्मयाद एसएमएस सेवा - जर तुम्ही बोलणे कमी आणि मेसेजिंग जास्त करत असाल तर अर्मयाद एसएमएस सेवेचा प्लॅन घ्या. तसे केल्यास तुम्हाला मेसेजिंगचा फायदा मिळेल.