गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

या दहा गोष्टी कुणाला नका सांगू...

सोशल मीडियाच्या या काळात लोकांशी आपल्या पर्सनल गोष्टी लपवणं आता कठिण झाले आहे. त्यातून आपले मित्र नसलेल्या लोकांना आपल्याबद्दल जाणून घ्याची जास्त उत्सुकता असते. त्यातून अनेक असे असतात ज्यांना आपल्या जीवनातील काही गुपित जाणून घ्याचे असतात अर्थातच असे लोकं आपले शुभचिंतक असू शकतं नाही. ते फक्त आपली कमजोरी, पात्रता जाणून वेळ पडल्यावर आपल्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच जीवनात काही गोष्टी गोपनीय ठेवल्या तर आपल्याला फायदा होईल.


वय
अनेक लोकांना आपले वय किती आहे हे जाणून घ्याची फार उत्सुकता असते. कोणी खोदून खोदून आपले वय विचारले तर प्रश्न टाळू द्या.
 
अनेक डॉक्युमेंट्समध्ये वय सांगावं लागतं, पण अनेक जागा अश्याही आहे जिथे वय सांगण्याची गरज नाही. आजकाल अनओळखी लोकं ही विचारून घेतात की आपले वय किती? सो इग्नोर देम.
 

संपत्ती
लोकांना हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते की आपली इन्कम किती आहे. आपण त्यांना सरळ उत्तर नाही दिले तरी ते दुसर्‍या मार्गाने जाणून घेण्याच्या प्रयत्नात असतात. म्हणून आपण आपले धन गुप्त ठेवलेस तर फायद्यात राहाल.
धन संपत्तीबद्दल मित्रांनाच काय तर नातेवाइकांनादेखील काही सांगू नाही. हो, पण नवरा-बायकोमध्ये पारदर्शिता हवी.

घरातील रहस्य
घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याला घरातील काने-कोपरे दाखविण्याची गरज नाही. आपले विश्वासपात्र लोकांना सोडलं तर इतर लोकांना ड्राइंग रूमपर्यंतच सीमित ठेवावे.


कौटुंबिक गोष्टी
अनेक लोकं आपल्या वैयक्तिक जीवनातील गोष्टी आपल्या मित्रांसोबत किंवा नातेवाइकांशी शेअर करत असतात. अशाने त्याला हलकं वाटतं असाही त्यांचा तर्क असतो. पण असे केल्याने नंतर पछतावा होतो हे लक्षात ठेवा. घरातील गोष्टी घरातच राहू द्यावा.



आपल्या कुटुंबातील लोकांचे स्वभाव, त्यांच्या आपल्याला आवडत नसलेल्या गोष्टी, आपसातील भांडणं हे काहीही बाहेर शेअर करू नये. अशात लोकं मदत तर करत नाही वरून मजा करता आणि इतर चार लोकांमध्ये आपली  थट्टा मांडतात.

दान-पुण्य
आपणं जे काही दान करत आहोत त्याला गुप्त ठेवलं तर लाभ मिळतो. गुप्त दान केल्याची नोंद देवाकडे असते म्हणून स्वत:चे कौतुक करण्याने त्या दानचे फल निष्फल होऊन जातं.
मंदिरात दान करा, गरिबांना जेवू घाला, अनेक पुण्य काम करा पण याचे स्वत:च्या तोंडून व्याख्या करू नका.

गुरुमंत्र, साधना आणि तप
जर आपण एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल आणि त्यांनी आपल्याला काही मंत्र दिलं असेल तर ते गुप्त ठेवावे. गुरुमंत्र अनेक प्रकाराचे असतात, जसे कोणी आपल्याला काही ज्ञान दिले असतील किंवा काही कला शिकवली असेल तर ते गुरुमंत्र आहे.
याव्यतिरिक्त आपण एखादी साधना, ध्यान किंवा तप करत असाल तर ते गुप्त ठेवा नाही तर ते निष्फल होईल.

औषध-पाणी
आपला एखाद्या रोगावर उपचार चालत असेल आणि औषध-पाणी सुरू असेल तर ही गोष्ट आपल्या खास लोकांना सोडून सार्वजनिक करणे योग्य नाही. तसेच हे प्राचीन काळासाठी योग्य गोष्ट असावी.

काही लोकांचे हेही म्हणणे आहे की जर आपण दारू पीत असाल तर तेही गुप्त ठेवावे.

अपमान
सार्व‍जनिकरित्या आपला अपमान होत असेल तर प्रतिकार करा. पण काही कारणांमुळे अनेकदा व्यक्तीला अपमान सहन करावा लागतोच. अपमानाला डोक्यात पाळू नये, तसेच असे दुसर्‍यांदा घडायला नको त्याची तसदी घ्यावी.
हेही लक्षात असू द्या की आपल्या अपमानाबद्दल प्रचार करणे मूर्खता ठरेल. कारण अशाने सहानुभूति मिळणे तर दूरची गोष्ट आपण चर्चेचा विषय व्हाल.

आपली कमजोरी
अनेकदा आपली कमजोरी गुप्त ठेवणे हानिकारक ठरू शकतं तरी अनेकदा हे उघडकीस आणल्याने लोकं आपल्याशी चुकीचे वागायला लागतात. आपल्या मानसिक रूपाने छळायला लागतात.
अयोग्यता आणि कमजोरी यातील फरक समजून ते जाहीर करण्यापूर्वी विचार करून घ्या.

मन की बात
मनात अनेक अश्या गोष्टी असतात, असे स्वप्न असतात जे जाहीर केल्याने संकटात सापडू शकतात. आपल्या मनाची गोष्ट जाहीर केल्याने आपण इतरांच्या क्रोध किंवा द्वेष भावनांच्या आहारी जाऊ शकता.
मनात हजारो विचार उत्पन्न होत असतात पण बुद्धिमान त्यातील योग्य तोच विचार जाहीर करतो. प्रत्येक गोष्ट जाहीर केल्याने लोकं आपल्याबद्दल धारणा तयार करून घेतील आणि आपल्या चांगल्या गोष्टी दुर्लक्ष करून आपल्या अवगुणांबद्दल चर्चा करतील.