मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

रोप लावत आहे!

रोप लावताना मातीला व्यवस्थितरीत्या तयार करणे गरजेचे आहे, नाहीतर कीड लागून रोप खराब होतात. मातीला किड्यांपासून बचाव करण्यासाठी काळी माती, रेती आणि शेण समप्रमाणात घेऊन मिश्रण तयार करायला पाहिजे.

मातीला कुंड्यात टाकल्यानंतर प्रत्येक कुंड्यात दोन मूठ कडू लिंबाच्या खळीचे पावडर मिसळून प्रत्येक कुंडे तयार करायला पाहिजे.

नंतर पाण्याचे शिंपडे घालून बिया किंवा रोप लावायला पाहिजे.

थोड्या दिवसाने माती आणि खत बदलत राहावे.

किड्यांपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाचा गरम काढा तयार करून नंतर तो काढा रोपांवर टाकावा.