बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

लहान मुलांसारखी घ्या म्हातार्‍यांची काळजी

मूल रडत असेल तर आई-वडील घाबरून जातात. जास्त वेळ झोपला तरी काळजी वाटायला लागते, थोडा मोठा होऊन चालायला शिकला की ते त्याच्या रस्त्यात येणारे सामान बाजूला करून देतात. कारण फक्त एकच की तो आपल्यावर निर्भर असतो. तसेच म्हातारे झालेल्या आई-वडिलांना किंवा आजी-अजोबांनाही आपल्या मदतीची गरज असते.
 
65 वर्षांच्या वयानंतर एक तृतियांश लोकांना पडल्यामुळे इजा होते. ही रिस्क वयाबरोबरच वाढत राहते. म्हणून घर बनवताना म्हतार्‍यांची काय गरज आहे हे लक्षात असू द्यावी. किंवा त्यांच्या वयामानाने घरात काही बदल करायला हवे. घरात वयस्कर व्यक्ती चालण्यात सक्षम नसल्यास त्याची लहान मुलासारखी काळजी घ्यावी.
 
* म्हातार्‍यांना घरात अशी खोली द्यावी जिथून सतत कोणा न कोणाची ये जा चालत असेल.




 
 

त्यांना आवश्यक असलेल्या गोळ्या औषधे, बाम, पुस्तकं, टीव्हीचा रिमोट व इतर त्यांच्या बाजूला असू द्यावा. 

त्यांच्या खोलीपासून बाथरूमपर्यंत जाण्यासाठी रेलिंग लावायला हरकत नाही ज्याला धरून ते आरामात तिथपर्यंत पोहचू शकतात. तिथे पर्याप्त उजड असला पाहिजे याची पण काळजी घ्यावी.
 
जी जागा जास्त ओळी होत असेल तिथे मेट्स ठेवाव्या. ज्याने त्यांची पडण्याची भीती कमी होईल.


ते ज्याठिकाणी फेर्‍या लावत असतील तेथील फर्निचर, इलेक्ट्रिकल आयटम आणि इतर त्या सगळ्या वस्तू हटवून द्यावा ज्याने त्यांना इजा होण्याची शक्यता कमी होते.
 
त्यांच्याजवळ कॉर्डलेस बेल असू द्यावी ज्याने गरज भासल्यास ते न ओरडता आपल्याला बोलवू शकता.


ते बाहेर निघू शकतं नसतील तर आठवड्यातून एखादं दिवस त्यांना ड्राइंग रूम किंवा अंगणात बसवावे.
 
त्यांच्या दुखण्याबाबत किंवा इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. कारण ह्या अवस्थेत मानसिक साथाची खूप गरज असते.