वॉशिंग मशीनची काळजी घ्या
प्रत्येक घरातील अत्यंत सोयीचे उपकरण आहे वॉशिंग मशीन. मशीन आपला वेळ आणि मेहनत वाचवते म्हणून आपणही तिची थोडीशी काळजी घेतली तर मशीन वर्षोंनुवर्ष सर्व्हिस देत राहील.
* वॉशिंग मशीनबाबत काही माहीत नसल्यास त्यासोबत आलेल्या सूचना वाचा आणि त्याप्रमाणेच वापर करा.
* सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये कपडे धुऊन झाल्यावर घाण पाणी लगेच ड्रेन करा. खूप वेळ पाणी मशीनमध्ये राहील्यावर त्यातून दुर्गंध येते.
* कपडे धुऊन झाल्यावर मशीनचे झाकण उघडे ठेवा. याने मशीन पूर्णपणे कोरडी होते आणि त्यातून दमट वास येत नाही.
* मशीनचा टेबलासारखा उपयोग करू नये.
* मशीनच्या कंट्रोल पॅनलपासून कोणत्याही प्रकाराचे लिक्विड दूर ठेवा.
* स्टेन रिमूव्हरमुळे मशीनची फिनिशिंग खराब होते म्हणून शक्यतो हे मशीनमध्ये टाकणे टाळा.
* ड्रायर वापरताना त्यावर ड्रायर कॅप ठेवायला विसरू नका.
* प्रत्येक 10 ते 15 दिवसाने वॉशिंग मशीन आतून आणि बाहेरहून स्वच्छ करा.
* मशीनमधून कपडे स्वच्छ निघत नसतील किंवा त्यातून दुर्गंध येत असेल तर मशीन स्वत: किंवा मेकॅनिककडून आतपर्यंत स्वच्छ करून घ्यावी.