शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

सासू- सासर्‍यांसोबत राहण्याचे 7 फायदे

सासू- सासर्‍यांसोबत राहण्याची कल्पना केल्यावर अगदी 80-90 दशकाच्या सिनेमात व्हायचं तसं विचार करण्याची गरज नाही. विचारांमध्ये मतभेद आणि जनरेशन गॅप असूनही मोठ्यांसोबत राहण्याचे खूप फायदे आहेत. म्हणून माझी सासू तर.... अगदी... या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा. सगळेच सर्वगुण संपन्न नसतात, त्यांच्या काही गोष्टी आपल्या आवडत नसल्या तर आपल्यातही काही अवगुण असतील ह्या पण विचार करा.  एकदा विचार करून बघा की लग्न झाल्यावर सोबत राहिल्याने काय फायदे होतात.
बायांचा त्रास नाही
नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी सर्वात मोठा त्रास आहे कामवाल्या बायांसोबत डिल करणे. त्यांची गरज असते आणि त्यांना हँडल करणेही कठिण असतं. पण विश्वास ठेवा आपली सासू हे काम सहजपणे करू शकते.

 


घराची काळजी नाही
दोघेही वर्किंग असल्यामुळे घराची काळजी लागतेच. पण सासू- सासरे असले की कित्येक गोष्टी आपोआप सरळ होतात. मेंटेनेसला येणारी माणसे, बिल भरणे, ग्रोसरी आणणे इत्यादी छोट्या- मोठ्या गोष्टीं दुपारच्यावेळी त्यांच्या पाहण्यात सहजपणे निष्पन्न होतात.

आईच्या हाताची चव
आपण कितीही चांगले शेफ असाल तरी आईच्या हाताची चव वेगळीच असते. त्यातून आपल्या नवर्‍याला आवडत असलेली वस्तू त्याच्या मनाप्रमाणे मिळत राहिली तर तो ही खूश आणि तुम्ही पण. आणि सणासुदी तर आपण त्यांना जरा हातभार लावला की पंच पकवान तयार मिळतात.

विकेंड म्हणजे फन डे
कित्येकदा सासरच्यांशी दूर राहत असलेल्या मुलांना विकेंड किंवा सुट्टी लागली की आई-वडिलांकडे पळ काढवा लागतो. नाहीतर त्यांना वाईट वाटेल सतत मनात ही खंत असते. त्यामुळे ते आठवडाभर आपल्यासोबत असले तर विकेंडला आपण हवे तिथे हिंडू शकता.

भांडण होण्याचा प्रश्नच नाही
हे खरं आहे. मोठ्यांच्या धाकामुळे लहान-सहान गोष्टीं आपण इग्नोर करतो. आणि नवरा-बायकोसमोर भांडण्याची वेळ आली तरी काही मिनिटांमध्ये निभावली जाते. कारण मोठ्यांसमोर आपण आरडाओरडी करणे टाळता आणि वाद टळतो.

हवं तेव्हा माहेरी जा
सासू- सासरे असल्यामुळे घराची काळजी न घेता तुम्ही मोकळ्या मनाने माहेरी जाऊ शकता. नवरा नीट घर लॉक करेल की नाही किंवा सकाळ- संध्याकाळ काय जेवेल अश्या गोष्टीची काळजी करावी लागत नसते.'
mother

नाती जपल्या जातात
आपल्या बिझी शेड्यूलमध्ये आपल्या नातेवाइकांशी बोलायला, बसायला वेळ नसतो. अशात ते सर्वांशी जोडून ठेवतात. आणि त्यामुळे आपण ही नातेवाइकांशी जुळलेले राहतो. त्यांचे वाढदिवस, सण सर्व साजरे करतो. यातून सणासुदी मोठ्यांचा साथ, आशीर्वाद याने घर घरासारखं वाटतं. आपल्या मुलांना आजी- आजोबांचा साथ मिळाल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार घडतात.