गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

सुपरवुमन्ससाठी काही खास...

कुटुंब आणि स्वत:चं करियर सांभाळताना स्त्रियांची कायमच कसरत होत असते. यामुळे त्यांच्या आरोग्याची हेळसांडच होते. रोजच्या धकाधकीतून थोडासा वेळ स्वत:च्या आरोग्यासाठी देण्याची गरज आहे. किती तरी बिझी असाल तरी स्वत:कडे लक्ष दिले नाही तर घराची गाडी कशी चालणार. त्यासाठीच अजमावून पहा काही सोपे टिप्स:


 
स्वत:साठी वेळ काढा
दिवसभर दुसर्‍यासाठी राबणार्‍या स्त्रियांना काही वेळ आपल्या आवडीनिवडीसाठी देणं गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही एखादा छंद जोपासू शकता. काही नवीन शिकू शकता. वाचन करू शकता, किंवा एखादं अशी गोष्ट जी फार दिवसापासून शिकण्याची इच्छा बाळगत असाल मग ती साधारण एखादं रेसिपी किंवा पेटिंग का नसो पण ती बनविण्यासाठी वेळ काढा. याने नेहमीच्या कामातून ब्रेक तर मिळेलच नवीन ऊर्जाही मिळेल.
 

प्राणायाम करा
प्राणायाम अगदी साधा व सोपा योगप्रकार आहे. किमान 5 मिनिटं दीर्घ श्वसन केल्यास तुम्हाला शांत वाटेल. कोंदट वातावरणापेक्षा मोकळ्या हवेत प्राणायाम करण्याचा प्रयत्न करा. प्राणायामामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतील व तुम्हाला नवचैतन्य मिळेल.


सकस आहार घ्या
वारंवार शिळे पदार्थ खाणे टाळा. आहारात पुरेशी पोषकद्रव्ये शरीराला मिळतील याची खात्री करा. दूधजन्य पदार्थ, कडधान्य आणि इतर पोषक तत्त्व नियमित आहारात सामील करा.


लॅवेडर तेल वापरा
जर तुम्हाला रात्री अस्वस्थ वाटत असेल किंवा झोप येत नसेल तर उशीवर लॅवेंडर तेलाचे काही थेंब टाका. याने रात्री शांत झोप येण्यास मदत होते.