शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

सोनं खरेदी करण्याआधी.....

लग्नसराईच्या दिवसात सोन्याची खरेदी होत असते. त्यात सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांची चांदी होते. पण सोनं खरेदी करताना तुमची फसवणूक तर होत नाही, याची काळची घेणंही गरजेचं आहे. जाणून घ्या या सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात.....


 
* कॅरेटवरून सोन्याची शुद्धता ठरते. 24 कॅरेट सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं. 24 कॅरेटमध्ये 99 टक्के सोनं असतं. सोनं हा तसा मरू धातू, नाणी घडवण्यासाठी त्याचा वापर होते. पण सोन्यात दागिने घडवणं थोडं कठिण पडत असल्याने त्या इतर धातूंचं मिश्रण केलं जातं. आपल्या देशात 22 कॅरेट सोन्यातून दागिने घडवले जातात. यात 91.6 टक्के सोनं असतं. हिरे किंवा इतर मौल्यवान धातू जडवलेले दागिने 18 कॅरेट सोन्यात बनतात.
 
सोन्याची नीट पारख करून घ्या. हॉलमार्कवाले दागिने शुद्ध मानले जातात. त्यामुळे दागिने घडवताना सोनं हॉलमार्क प्रमाणित असल्याची खात्री करून घ्या.
 
 

* सोन्याच्या दरांबद्दल जाणून घ्या. वर्तमानपत्रांमध्ये सोन्या चांदीचे दर दिलेले असतात. इंटरनेटवरही याची माहिती असते. सोन्याच्या चढत्या आणि घसरत्या दरांबद्दलही जाणून घ्या. दागिने घडवताना घडणावळीचं शुल्क आकारलं जातं. अतिरिक्त शुल्क तर आकारला जात नाहीये ना, याकडे लक्ष द्या.


 
जुना दागिना घेऊन नवा खरेदी करण्याच्या अनेक योजना या दिवसांमध्ये आपल्या नजरेत येतात. मात्र भुरळला बळी न पडता शुद्धतेबाबत सोन्याची कोणतीही तडजोड करू नका. काही सराफा व्यवसायिक विविध प्रकारचं शुल्कही आकारतात. उगाचच अतिरिक्त शुल्क देऊन तुमचं बजेट वाढवून घेऊ नका. शक्यतो विश्वासातल्या सोनाराकडूनच सोनं खरेदी करा.