गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

स्वयंपाकघराचे बदलते रूप

नवीन घर घेताना त्यातील स्वयंपाकघराची रचना ही नवीन पद्धतीने केलेली असते. पण महिलावर्गाला त्यातही बदल हवासा वाटतो. साहजिकच सध्या मॉडय़ुलर किचनची फॅशन आहे. यात तोडफोड न करता किचनला आधुनिक रूप देऊ शकता. तुम्हीसुद्धा तुमच्या स्वयंपाकघराला नवीन लूक देण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


* स्वयंपाकघर बनवताना लागणारे सामान पाणी व आगीपासून बचाव करणारे असायला पाहिजे. हँडल, ड्रायर, स्लाइडस ही हार्डवेअर चांगल्या क्वालिटीची हवीत.

* स्वयंपाकघरात सामान ठेवण्यासाठी भरपूर स्टोरेज स्पेस असायला हवी. स्वयंपाकघराची देखभाल सोपी हवी. बेस युनिटबाहेर निघणारी व ट्रॉलीच्या आकाराची असल्यास त्याची साफसफाई व्यवस्थित करू शकाल.

* स्वयंपाकघराचे स्लँब किंवा प्लॅटफॉर्म तुमच्या उंचीनुसार असायला हवे. जास्त उंच किंवा जास्त खाली नको.

* डिश वॉशरच्या खाली एक प्लॅटफॉर्म बनवावा. तो 6 इंच असावा. यात भांडे धुतल्यास कमरेवर भार पडत नाही.

* स्वयंपाकघर हवेशीर आणि भरपूर प्रकाश असलेले असावे. तिथे एक्झॉस्ट फॅन जरूर लावावा.