शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

स्वयंपाकघरातला माइलस्टोन!

स्वयंपाकघराची स्वच्छता हा माइलस्टोन असतो. ती झाली की गृहिणीला अगदी 'हुश्श' वाटतं. यासाठी नियमित साफसफाई किंवा आठवड्यातील एक दिवस ठरवून आपण किचन स्वच्छ ठेवू शकतो. किचन मेंटेनन्समध्ये फ्रीजची स्वच्छता करतानाही फक्त इंटरनल नसावी तर बाहेरील बाजूला किंवा मागच्या जाळीवरील धूळ साफ करणंही तितकंच आवश्यक आहे. ट्रॉलिज साफ करताना ट्रॉलिजच्या चॅनेल्सना पाणी लावल्यास त्या गंजतात व कालांतराने त्यांचा वापरात कुरबूर चालू होते. तेव्हा त्या स्वच्छ करताना हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवावा.

किचन फर्निचरही आतून नेहमी स्वच्छ ठेवावं म्हणजे अन्नकणांमुळे होणार्‍या किटकांचा प्रादुर्भाव रोखता येतो. बाथरूम आणि किचन टाइल्ससाठी वापरण्यात येणारी ग्राऊट नेहमी तपासून घ्यावी. ती निघाली असल्यास त्यात पाणी झिरपून भिंतीचे पृष्ठभाव खराब होण्याची शक्यता असते किंवा भिंती नेहमी ओल्या राहतात व त्याचा परिणाम रंगांवर होतो. अशावेळी रंगरगोटीवर आपण कितीही खर्च केलेला असला तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही. किचनमध्ये चिमणी लावलेली असल्यास तिच्या स्वच्छतेकडेही लक्ष पुरवावं लागतं, त्याच्या जाळ्या काढता येण्यसारख्या असल्यास काढून स्वच्छ करता येतात अथवा पुन्हा याचंही सर्व्हिस काँट्रॅक्ट देता येतं. घरातल्या वस्तू आणि त्यांचा मेंटेनन्स यामुळे त्या दीर्घकाळपर्यंत वापतरा येतात व त्याच्या दुरुस्तीवर खर्च करण्यापेक्षा थोडासा वेळ खर्च केल्यास ते अधिक फायद्याचं ठरतं.