शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

स्वयंपाकघरासाठी काही टिप्स

पुलाव आणि भाजी तयार करताना त्यात मटरचे दाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्यात 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ घालून उकळावे.

इडलीला सॉफ्ट बनविण्यासाठी इडलीच्या मिश्रणात एक चमचा खोबर्‍याचे तेल टाकावे.

हाताला जर लसणाचा वास येत असेल तर एक तुकडा आलं कापून तो हाताला चोळावा त्याने लसणाचा वास दूर होतो.

कोबीची भाजी बनवताना त्यात एक तुकडा ब्रेडचा टाकल्याने कोबीचा वास दूर होतो.

कांदा परतताना त्यात चिमुटभर साखर टाकल्याने कांदे लवकर सोनेरी होतात.

आईस ट्रेमध्ये पाण्यासोबत कॉफी पावडर टाकायला पाहिजे, कारण कोल्ड कॉफीत आईस क्यूब टाकल्याने कॉफी जास्त चवदार लागते.

मटण शिजल्यानंतर सॉफ्ट राहण्यासाठी शिजवताना त्यात एक दोन तुकडे पपीतेचे टाकावे.

किचनची टाइल्स साफ करताना दोन चमचे खाण्याचा सोडा टाकून स्पंज ने पुसून काढावे, टाइल्स एकदम चमकदार होतील.

फुलगोबी शिजवताना गोबीचा रंग पांढरा शुभ्र दिसण्यासाठी त्यात एक चमचा कणीक घालावी.

बटाटे व अंडी उकळताना त्यात थोडेसे मीठ टाकल्याने ते तुटत नाही.