गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

हे 6 नुकसान वाचल्यावर नेलपॉलिश लावणे सोडाल

नखांवर नेलपॉलिश लावल्यावर हातांची सुंदरता वाढते. पण आपल्याला हे माहीत आहे की हे आपल्यासाठी किती धोकादायक आहे. अनेक लोकं हा विचार करतात की यात काय धोका कारण आम्ही तर उजव्या हाताच्या नखांवर नेलपॉलिश लावतच नाही. तरीही याचे काय नुकसान आहे याची कल्पना आपण कधीच केली नसेल. बघू या हे तयार करण्यासाठी कोणते केमिकल्स वापरले जातात आणि त्याने कोणत्या प्रकाराचा धोका निर्माण होतो.
 
नियमित नेलपॉलिश वापरणार्‍या महिलांवर केलेल्या शोधामध्ये हैराण करणारे तथ्य समोर आले: 
 
1. नेलपॉलिशमध्ये ट्रिफेन्यल फॉस्फेट आढळतं: नेलपॉलिश लावणार्‍या महिलांमध्ये ट्रिफेन्यल फॉस्फेट सारखं विषारी पदार्थ असल्याचे आढळून आले आहे. नेलपॉलिशच्या लेबलवर याचा कुठेही उल्लेख नसतो.
2. मेंदूवर परिणाम: सर्वात मोठा धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा केमिकल शरीरात प्रवेश करून ह्युमन सिस्टममध्ये गंभीर बदल आणतं. हे विशेषतः मेंदू आणि मज्जासंस्थेत बदल करतं. याने पचन क्रिया गडबडते आणि संप्रेरक प्रणाली गोंधळून जाते.

3. मेरुदंडाला नुकसान: नेलपॉलिशमध्ये आढळणारा न्यूरो-टॉक्सिन असा विषारी पदार्थ आहे ज्याचा परिणाम मेंदूवर होतो. याव्यतिरिक्त या परिणाम मेरूदंडावरही होतो.
4. कर्करोगाचा धोका: यात आढळणारा फॉर्मेलडेय्डे असा घटक आहे ज्याने कार्सिनोजेनिक किंवा कर्करोग होण्याचा धोका असतो. याचा उपस्थितीमुळे कँसर सेल्स निर्मित होतात.
 

5. बाळावर परिणाम: नेलपॉलिशात आढळणारे टोल्यून नामक घटक सरळ आईच्या दुधात शिरतं. स्तनपान करवणार्‍या स्त्रियांच्या माध्यमातून हे सरळ बाळापर्यंत पोहचतं. याचा बाळाच्या विकासावर परिणाम होतो. नेलपॉलिश लावल्याच्या 10 तासानंतर, याचा परिणाम शीर्षावर असतो.
6. नेलपॉलिशचे हानिकारक परिणाम: सर्वात मुख्य परिणाम घश्यात इन्फेक्शन या रूपात समोर येतो. नेलपॉलिश लावल्याच्या 10 तासानंतर आपल्याला घसा खवखवणे आणि सूज जाणवू शकते. याव्यतिरिक्त स्किनवर खाज आणि जळजळही होऊ शकते.