गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

32 लाख टन साखरेचे उत्पादन

WD
राज्यामध्ये सुरू असलेल्या उसाच्या गाळप हंगामात अखेर 300 लाख टनापेक्षा अधिक गाळप झाले असून साखर उत्पादन 32 लाख टन झाले असणे शक्य आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या सहकारी आणि खासगी कारखाने असे 155 कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये 94 सहकारी आहेत.

साखर कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 10 टक्के उतारा आला आहे. यावर्षी उसाची उपलब्धता लक्षात घेता हंगाम आणखी तीन महिने सुरू राहील असा अंदाज आहे. संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभागात जास्त म्हणजे 75 लाख टन साखर तयार झाली आहे. तेथील उतारा 11 टक्के झाला पण कारखाने मात्र 35 आहेत सर्वात कमी साखर 2.38 टक्के नागपूर विभागात तयार झाली आहे. नगर विभागात 50 टक्के तर पुणे विभागात 125 टन साखर तयार झाली आहे.