शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

यंदा अन्नधानचे विक्रमी उत्पादन

राष्ट्रपती मुखर्जी यांचे प्रतिपादन

WD
यंदा देशात मरगील सर्व विक्रम मोडीत काढत विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार आहे. त्याचबरोबर कृषीक्षेत्राचा विकासदर चार टक्क्यांपर्यंत होणार आहे, असा विश्वास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केला आहे.

2011-12 मध्ये 259 दशलक्ष टन तर 2012-13 मध्ये 250 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन झाले. हे सर्व विक्रम यंदा मोडले जाणार आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रपती मुखर्जी यांनी बारामती येथे कृषी विज्ञान केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी केले.

कृषीक्षेत्रात होत असलेल्या चांगल्या कामगिरीबद्दल मुखर्जी यांनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि त्यांच्या मंत्रालाच्या भूमिकेचे कौतुक केले आणि म्हणाले की, भारत आज केवळ सर्वाधिक तांदूळ उत्पादक देश म्हणून नव्हे तर तांदळाची मोठय़ाप्रमाणात निर्यात करणारा देश म्हणून उदयास आला आहे. त्याचबरोबर गहू, साखर आणि कापूस आदींची निर्यात करणारा दुसर्‍या क्रमांचाचा देश म्हणूनही भारत पुढे आला आहे, असेही ते म्हणाले.

या वर्षीच पहिल्या सहामाहीत कृषी विकासदर 3.6 टक्र्क्यांपर्यत पोहोचला आहे. लवकरच तो 4 टक्र्क्यांपर्यंत निश्चितपणे जाणार आहे, असे सांगून मुखर्जी यांनी अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत देशातील जनतेला अन्नधान्य पुरविण्यास देश समर्थ ठरणार आहे, असा विश्वासही व्यक्त केला.

कृषीक्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने बजावलेल्या भूमिकेचा उल्लेख करून मुखर्जी म्हणाले, प्रस्तावित कृषी नाविन्यता निधीमुळे नवीन उत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यास आणि शेतकर्‍यांकडून नवीन उत्पादन पध्दतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.