बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By भाषा|

सेबीचा गुंतवणूकदारांना सल्ला, जरा जपून

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येत असली तरी गुंतवणूकदारांनी डोळे उघडे ठेवूनच गुंतवणूक करावी असा सल्ला सेबीचे अध्यक्ष सी बी भावे यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.

आर्थिक मंदी ओसरली आहे. जगभरातील बाजार पुन्हा पूर्वपदावर येत आहेत. असे असताना गुंतवणूकदारांनी अतिउत्साहात काम करण्याऐवजी सांभाळून गुंतवणूक करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

जपान, अमेरिकेसह 16 देश मंदीतून बाहेर पडले असले तरी गुंतवणूकदारांनी योग्य सल्ला घेतल्यावरच आपले पैसे गुंतवावेत असे भावे म्हणाले.