गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

जुळून येती रेशीमगाठी

WD

विवाहाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, पृथ्वीवर फक्त सोहळे साजरे होतात, असे मानले जाते. शिक्षण, आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती कशीही असली, तरी मुलीला आपल्या भाग्याने चांगला जोडीदार मिळतो, त्या रेशीमगाठीच म्हणायच्या.

माझेच उदाहरण द्यायचे तर मी एका गरीब घराण्यात जन्माला आली. घरात अठरा विश्‍वे दारिद्रय़. आम्ही तीन बहिणी. वडिलांना दारूचे व्यसन. अशा परिस्थितीत आमचे विवाह कसे होतील, असा यक्षप्रश्न. अशा परिस्थितीत गावाजवळील एका पार्डी नावाच्या गावातील एका मुलाचे स्थळ आले. मुलगा नाशिकला एका कंपनीत कामाला असल्याचे कळले. विवाह करण्यास पैसा नव्हता, तर हुंडा कोठून देणार? मुलांकडच्यांना हे माहीत होताच, त्यांनीच मुला-मुलीचा कपडा, विवाहाचा, जेवणावळीसह सर्व खर्च करण्याचे निश्‍चित केले. ज्या मुलीचा विवाह होणे दुष्कर होते, त्या मुलीला देवासारखा नवरा लाभला, अशी मी भाग्यवान होय. आज हुंड्यापायी किती मुलींचे संसार उघड्यावर पडतात. मला अगदी काही नसताना सर्व मिळाले. आज माझे पती कायद्याचे अभ्यासक आहेत. एका ग्राहक समितीचे अध्यक्ष आहेत; शिवाय पती निर्व्यसनी आहेत याचा सार्थ अभिमान आहे.