testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठी कथा : दोन हिरे

Last Modified शनिवार, 20 ऑगस्ट 2016 (12:44 IST)
थंडीचे दिवस होते. त्यामुळे एका राजाने त्याचा दरबार महालात न भरवता उघड्या मैदानात भरवलेला असतो.
सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रजा बसलेली. कामकाज सुरु होते. इतक्यात तिथे बाहेरगावाहून एक माणूस येतो. तो राजाला म्हणतो, "माझ्याजवळ दोन वस्तू आहेत. त्यात एक नकली आहे आणि एक असली आहे.
मी आजवर अनेक राज्यातून फिरत आलोय. आजवर एकानेही असली वस्तू ओळखली नाहीये.
ती जर तुमच्यापैकी कोणी ओळखली तर ती वस्तू तुमच्या खजिन्यात मी आनंदाने जमा करेन,
मात्र कोणीच ओळखली नाही तर त्या असली वस्तूच्या किमती इतके धन तुम्ही मला दिले पाहिजे.
आजवर माझे हे आव्हान कोणीही जिंकू शकलेले नाहीये." जमलेल्या लोकात उत्सुकता पसरते. कि काय असेल ती वस्तू ? शेवटी राजा तयार होतो. राजाच्या समोरच्या मंचावर तो माणूस आपल्या पोतडीतून दोन वस्तू काढून ठेवतो. दोन्ही सेम टू सेम असतात. काडीमात्र फरक दोन्हीत नसतो. सेम रंग, सेम ठेवण, सेम प्रकाशमान !!
राजा म्हणतो, "त्यात काय अवघड आहे ? या दोन्ही वस्तू समानच आहेत. ते दोन्ही हिरे आहेत."

तो माणूस म्हणतो, "नाही राजन, त्यातला एक असली हिरा आहे, व एक नकली (काचेचा) तुकडा आहे." आता मात्र सगळेच चकित होतात. जवळून अनेकजण निरीक्षण करतात. कोणालाच ओळखू येत नाही.
शेवटी राजाही प्रयत्न करून पाहतो. तो ही हरतो. मग ठरल्याप्रमाणे त्या असली हिऱ्याच्या किमतीइतके धन त्या माणसाला देण्याची वेळ येते. इतक्यात प्रजेपैकी एक आंधळा माणूस उठतो आणि म्हणतो, "हे राजन, तसेही आपण आव्हान हरलो आहोत. मग एक शेवटची संधी मला द्या. जिंकलो तर आपला फायदा आहेच आणि हरलो तर तसेही तुम्ही धन देण्याची तयारी केलीय"राजा क्षणभर विचार करून त्या अंध व्यक्तीला परवानगी देतो.

अंध व्यक्ती दुसऱ्या एका माणसाच्या मदतीने त्या मंचाजवळ येतो. दोन्ही वस्तूवरून हात फिरवते.
आणि एका झटक्यात सांगते कि "हा असली हिरा आहे आणि तो नकली आहे" सगळेच चकित होतात. विशेषतः तो माणूस देखील चकित होतो. कारण आजवर कुणालाच जे जमले नाही ते एका अंधाला कसे जमले ? पण शेवटी ठरल्याप्रमाणे तो असली हिरा राजाला देऊन तो माणूस या अंध व्यक्तीला विचारतो, कि बाबारे, तू कसे ओळखले?

यावर हसून अंध म्हणतो, "सोप्पे होते. मी हात लावून पाहिल्यावर त्यातला एक थंड होता आणि दुसरा गरम ! जो थंड होता तो हिरा आणि जो गरम झाला होता तो नकली होता ! कारण काच जास्त गरम होते. हिरा तितका गरम होत नाही" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होतो आणि अंध व्यक्तीच्या पायाशी तो माणूस वाकून नमस्कार करतो !!

जीवनात देखील असेच असते. जो माणूस वेळोवेळी गरम होत असतो, तो काच समजावा आणि जो विपरीत परिस्थितीत देखील थंड (म्हणजे शांत) राहतो तो "हिरा" समजावा !! त्याच्याशी मैत्री वाढवावी..... अशांमुळेच आयुष्याचे सोने होते !!


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

खास पंजाबी ढाबा : माखनी डाळ (दाल माखनी)

national news
सर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल ...

लिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी

national news
झोपेतून उठल्यावर आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी लागतेच. बहुतेकदा आपल्या सकाळची ...

कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर मेकअप करताना घ्या काळजी

national news
अलीकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी ...

Home Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...

national news
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...

रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे

national news
* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...