testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठी कथा : माणुसकी

marathi katha
वेबदुनिया|
ती सुपरफास्ट एक्सप्रेस बस जिल्ह्यातून राजधानीकडे भर वेगाने जात होती. त्या बसमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांपैकी बहुतेक लोक काही ना काही कामासाठी राजधानीमधल्या सचिवालय व मंत्रालयामध्ये जात होते. तिथे त्यांची निरनिराळ्या प्रकारची सरकारी काम होती. कोणाला आपल्या भरलेल्या टेंडरच्या मंजुरीबद्दल माहिती काढायची होती, तर कोणाला आपल्या बदली किंवा प्रमोशनच्या संदर्भात मंत्र्यांना भेटायचे होते. प्रत्येकाचं काही ना काही काम होतं. त्यांना ऑफिस टाइममध्येच मंत्रालयात पोहोचायचं होत.
बसचा ड्रायव्हर फारच वेगात गाडी चालवत होता. कधी सडकेवर चालणार्‍या वाटसरुच्या इतक्या जवळून गाडी न्यायचा की जणू तो गाडीखालीच येतो की काय. कधी एखाद्या सायकल चालकाजवळ जोराने हार्न वाजवून त्याला सडकेच्या खाली सायकल चालवायला भाग पाडायचा.

ड्रायव्हरच्या या वागणुकीबद्दल प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली. प्रत्येक जण त्याच्या या हलगर्जीपणाबद्दल त्याच्यावर टीका करू लागला. कोणी म्हणालं की हे ड्रायव्हर माणसाला जनावरापेक्षा कमी किंमत देतात. तर काहींचं म्हणणं पडलं की आजकाल माणुसकी हा प्रकारच राहिला नाही आहे.

इतक्यात ड्रायव्हरच्या चुकीने रस्ता सावकाशपणे ओलांडणारा एक म्हातारा गाडीचा धक्का लागून जखमी होऊन रस्त्यावर पडला. काही लोकांना वाटलं की तो बहुतेक मेला असावा. प्रवाशांपैकी काही लोक गाडीच्या खाली उतरले व पाहिले की म्हातारा बराच जखमी झाला होता त्याला हॉस्पिटलामध्ये घेऊन जाणं आवश्यक होत. अँक्सीडंटची केस असल्यामुळे पोलिसमध्ये जाणंही भाग होत.

या घडलेल्या प्रकाराबद्दल लोक ड्रायव्हरला शिव्या घालू लागले व म्हणाले आम्ही मघाचपासून बघतोय तू तू किती निष्काळजीपणे गाडी चालवतोय. तुला अजिबात माणुसकी नाहीये.

इतक्यात पोलिस आले. त्यांनी अँक्सीडेंटबद्दल चौकशी सुरू केली. त्यांनी सांगितले, की आता पंचनामा बनवून एफ.आय.आर नोंदवावा लागेल. मग गाडी पोलीस ठाण्यामध्ये जाईल आणि कोर्टाच्या परवानगीनंतरच सोडली जाईल.

त्या बस प्रवाशांच्या लक्षात आलं, की जर असं झालं तर ते वेळेवर राजधानीमध्ये पोहचू शकणार नाहीत. त्यांची सगळी कामे लटकतील. तेव्हा सर्व प्रवाशांनी एकमताने ड्रायव्हर व्यवस्थित व ट्रॅफिकच्या नियमांप्रमाणे गाडी चालवत होता. पण या म्हातार्‍याचेच सडकेवर चालताना भान नव्हते. तो आपल्याच तंद्रीत चालत होता. तेव्हा चूक म्हातार्‍याचीच आहे अशी साक्ष दिली. त्याचबरोबर पोलिसाने प्रकरण निकालात काढले व रेकार्ड करून दिले. आणि त्या म्हातार्‍याला त्याच्या नशिबावर सोडून 'माणुसकी'चा बडेजाव सांगणार्‍या प्रवाशांना घेऊन ती बस राजधानीकडे निघून गेली.
- प्रकाश दांडेकर


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

पाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा

national news
बारीकसारीक व्याधींमध्ये पाय, कंबर, दात दुखणे असले प्रकार मोडतात. म्हटले तर या व्याधी ...

यू नेव्हर नो...

national news
हातात पेढे घेऊन मेघा ताईच्या घरची पायरी चढताना संपूर्ण भूतकाळ अमोलच्या स्मृतीत तरंगत ...

रेल्वेमध्ये नोकरीची संधी, दहावी पास कोणतीही परीक्षा ...

national news
South Western Railway Recruitment 2019 रेल्वे भरती सेलमध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. ...

कंबाला आणि थोडा

national news
कर्नाटकमधल्या गावांमध्ये बफेलो रेसचं आयोजन केलं जातं. या शर्यतीला 'कंबाला' म्हणतात. ...

थकवा आणि कमजोरी घालवण्यासाठी नंबर 1 आहे हे ड्रिंक

national news
आमचा 60-70 टक्के शरीर पाण्याने बनले आहे. जेव्हा आमच्या शरीरात पाण्याची मात्रा कमी होते तर ...