testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

‘स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता' : बोधकथा

parrot
Last Modified मंगळवार, 15 सप्टेंबर 2015 (12:55 IST)
प्रतापरावांच घरी एक होता. प्रतापराव जे जे शिकवतील तसे तो बोलायचा. स्वातंत्रच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रतापरावांनी त्याला
नवा शब्द शिकविला होता. ‘स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता.’

पोपटाने ते शब्द चांगलेच आत्मसात केले होते. तेव्हापासून तो तसे बोलतही होता. एकदा प्रतापरावांकडे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या

प्रतिसरकारमधील स्वातंत्र्यसैनिक पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी त्या पोपटाचे आक्रंदन ऐकले. त्यांना झोपच लागेना. कारण त्यांनी
बेचाळीसच्या लढय़ात कारावास भोगला होता आणि त्यांना ‘स्वतंत्रता’ या शब्दाचे मोल माहीत होते. अखेर रात्री ते उठले. हळूच पिंजरा उघडून तंनी पोपटाला धरले. बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पोपट एका पायाने पिंजरा घट्ट धरून होता. शेवटी कसेतरी त्यांनी त्या पोपटाला बाहेर काढले आणि मोकळ्या हवेत सोडले. त्या रात्री त्यांना शांत झोप लागली. सकाळी उठून पाहातात तर पिंजर्‍याचे दार उघडे होते. पण आत पोपट होता. आणि बोलत होता, ‘स्वतंत्रता, स्वतंत्रता, स्वतंत्रता.’

तात्पर्य : जे सत्य स्वत:ला गवसलेले नसते त्याचा जीवनाला काडीमात्र उपयोग नसतो. पढविलेल्या सत्याइतके असत्य काहीच नसते.


यावर अधिक वाचा :

इंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश

national news
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...

आयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल

national news
आयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...

सोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ

national news
गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...

स्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

national news
उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...

शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला

national news
बलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...